Tips And Tricks How To Clean Blocked Kitchen Sink In Minutes Apply These Tricks It Will Help You
किचन सिंक वारंवार तुंबतं, पाणी साठतं? १ ट्रिक वापरा, सिंकमध्ये तुंबलेल्या पाण्याचा होईल निचरा By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 06:10 PM2024-06-22T18:10:52+5:302024-06-26T18:41:59+5:30Join usJoin usNext किचन (Kitchen Sink) स्वच्छ ठेवणं फार महत्वाचे असते कारण किचमध्ये दिवसभराचा स्वयंपाक बनवला जातो. किचनमध्ये घाणं पसरवल्याने अनेक गंभीर आजार उद्भवतात. (How To Clean Blocked Kitchen Sink) . किचनमध्ये खासकरून टाईल्स, गॅस, सिंक लवकर खराब होतात. किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काही सोप्या उपायांचा अवलंब करू शकता. ज्या ठिकाणी तुम्ही भांडी ठेवता ती जागा रोज धुवा. किचन सिंकमध्ये कचरा अडकल्यामुळे ते ब्लॉक होते. किचन सिंक कसे स्वच्छ करायचे ब्लॉक किचन सिंक साफ करण्यासाठी हा सर्वात चांगला उपाय आहे. यासाठी कॉफी पावडर लिक्विड साबण आणि गरम पाण्याची आवश्यकता असेल. किचन सिंक पाण्याने भरत असेल तर कॉफी पावडर आणि लिक्विड सोपचा वापर करा. त्यानंतर यात गरम पाणी घाला. असं केल्यानं सिंकमधील घाणं स्वच्छ होते. सिंकमधून दुर्गंध ही येत नाही. किचन सिंकची घाण काढून टाकण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. सगळ्यात आधी किचन सिंकमध्ये बेकिंग सोडा घाला. ज्यामुळे सिंकचा घाणेरडेपणा सहज स्वच्छ होईल. व्हिनेगर नसेल तर तुम्ही याऐवजी लिंबाचा रसही वापरू शकता. किचन सिंक आठवड्यातून किंवा १० दिवसांतून एकदा स्वच्छ करायला हवं. ज्यामुळे सिंक नेहमी चमकदार राहते. सिंक ब्लॉक होऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचे आहे. सिंकमध्ये घारणेरडी भांडी घालताना नेहमी अन्नाचे कण बाहेर काढून घ्या. सिंक ड्रेनवर एक जाळीदार कव्हर लावा जेणेकरून घाण ड्रेनेज पाईपमध्ये घुसणार नाही.टॅग्स :सोशल व्हायरलसुंदर गृहनियोजनकिचन टिप्सSocial ViralHomekitchen tips