रोज ब्रश करूनही तोंडाचा घाण वास जात नाही? ५ पदार्थ खा, दुर्गंधी कमी होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2025 17:47 IST2025-02-15T16:17:59+5:302025-02-15T17:47:01+5:30

काही जणांना मुखदुर्गंधीचा खूपच त्रास असतो. दररोज ब्रश करूनही त्यांच्या तोंडाचा घाण वास येतो. यामुळे मग चारचौघांत बोलायलाही त्यांना खूप लाजिरवाणं होऊन जातं.
हा त्रास कमी करण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातले काही पदार्थ नक्कीच उपयोगी येऊ शकतात. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया..
सगळ्यात पहिला पदार्थ आहे वेलची. दररोज एखादी वेलची बारीक चावून खा. त्यामुळे तोंडात दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांचं प्रमाण कमी होतं आणि दुर्गंधी कमी हाेण्यास मदत होते.
दालचिनीमधील ॲण्टीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास मदत करतात. यासाठी दिवसातून एकदा दालचिनीचा काढा तुम्ही घेऊ शकता.
जेवण झाल्यानंतर नियमितपणे चमचाभर बडिशेप बारीक चावून खाण्याची सवय लावून घ्या. तोंडाचा घाण वास बऱ्यापैकी कमी होईल.
मुखदुर्गंधी कमी करण्यासाठी लवंगही उपयुक्त ठरते. यासाठी लवंग किंवा लवंगाच्या तेलाचा वापर तुम्ही करू शकता.
तुळशीची पानं चावून खाल्ल्यानेही ताेंडाचा घाण वास बऱ्यापैकी कमी होऊ शकतो.
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. तसेच कच्चा कांदा- लसूण खाण्याचे प्रमाण कमी करावे.