पोट सुटलं, मांड्यावरची चरबी वाढली? ५ व्हेज पदार्थ रोज खा- चरबी घटेल लवकर-स्लिम दिसाल By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 12:45 PM 2023-08-04T12:45:33+5:30 2023-08-04T16:19:46+5:30
Tips for belly fat loss : वजन कमी करण्यासाठी ड्रायफ्रुट्स हा उत्तम पर्याय आहे. बदाम, काजू, मनुके, अक्रोड, अंजीर आणि पिस्ता वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. एकदा वजन वाढलं की ते कमी करणं खूप कठीण होतं. कारण वजन वाढायला जास्त वेळ लागत नाही पण कमी करण्यसाठी महिनोंमहिने निघून जातात. काही शाकाहारी पदार्थ तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. अतिरिक्त खाण्यावर नियंत्रण ठेवून तुम्ही शरीरात साचलेलं फॅट कमी करू शकता. (How to loss belly fat)
पोट, मांड्या, दंडाची चरबी कमी करण्यासाठी काही सोपे उपाय फायदेशीर ठरू शकतात. आहारात बदल करून तुम्ही वजन आणि फिगरही मेंटेन ठेवू शकता (How to loss weight in 5 steps)
१) वजन कमी करण्यासाठी संत्री, टरबूज, सफरचंद, पिअर, यांसारखे फळं खायला हवीत यात कमी कॅलरीज असतात. फायबर्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्स यांसारख्या पोषक तत्वांमुळे यांचे सेवन फायदेशीर ठरते.
२) उडीद डाळ, मूग डाळ, राजमा, चना आणि बेसन यांसारख्या डाळींमध्ये प्रोटीन्स असतात यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहते. डाळींचा आहारात समावेश केल्यास स्नायू आणि हाडं चांगली राहतात.
३) भाज्यांमधील पोषक तत्वांमुळे वजन कमी करण्यासही मदत होते. दूधी, कारलं, पालक, मोहोरी, साग, मेथी, फूल कोबी, आणि गाजर उत्तम आहे.
४) दही आणि पनीर प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. वजन कमी करण्यासाठी हे दोन्ही पदार्थ फायदेशीर ठरतात. पनीरमध्ये प्रोटिन्स असतात ज्यामुळे स्नायूंचा विकास होतो आणि दह्याच्या सेवनानं शरीराला चांगले बॅक्टेरीयाज मिळतात जे पचनक्रिया चांगली ठेवण्यास फायदेशीर ठरतात.
५) वजन कमी करण्यासाठी ड्रायफ्रुट्स हा उत्तम पर्याय आहे. बदाम, काजू, मनुके, अक्रोड, अंजीर आणि पिस्ता वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.