नवीन जीन्सचा खूप रंग जातो? धुताना पाण्यात 1 वस्तू मिसळा, वर्षानुवर्ष रंग टिकेल, नवी दिसेल जीन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 03:56 PM2024-03-01T15:56:10+5:302024-03-01T16:07:23+5:30

Tips To Wash Jeans Without Losing Color : जीन्स धुताना नेहमीच थंड पाण्याचा वापर करा.

महिला असो किंवा पुरूष जीन्स सर्वांनाच घालयला आवडते. इतर आऊटफिट्सच्या तुलनेत जीन्स महाग असते. पण2 ते 4 वेळा धुतल्यानंतर जिन्सचा रंग फिकट होऊ लागतो आणि लूक खराब होतो. (How to Keep Jeans From Fading)

काही सोप्या ट्रिक्स फॉलो करून तुम्ही जिन्सची चमक नव्यासारखी करू शकता. जीन्सचा रंग निघू नये यासाठी काही खास गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ज्यामुळ वर्षानुवर्ष तुम्ही वापरत असलेली जीन्स नव्यासारखी दिसेल.

सगळ्यात आधी जीन्स धुताना काही चुका करणं टाळायला हवं. लोक जिन्सवर लागलेली घाण आणि मळ निघून जाण्यासाठी गरम पाण्याचा वापर करतात.

गरम पाणी हे जिन्सचा रंग फेड होण्याचं मोठं कारण आहे. जीन्स थेट ऊन्हात सुकवू नका. जास्त ऊन लागल्यामुळे जिन्सचा रंग फेड होत जातो.

जीन्स धुताना नेहमीच थंड पाण्याचा वापर करा. एक बादली थंड पाण्यात अर्धा कप व्हाईट व्हिनेगर घाला. त्यात धुतलेली जिन्सा १५ ते २० मिनिटांसाठी तशीच ठेवून द्या.

नंतर जीन्स पाण्यातून बाहेर काढून त्यातलं पाणी काढून हँगर लटकवून ठेवा.असं केल्यानं रंगही उडणार नाही आणि जिन्सचे कापड सॉफ्ट राहील

इतर कपड्यांबरोबर जिन्स न भिजवता वेगळ्या बादलीत जिन्स भिजवा ज्यामुळे जास्त रंग लागणार नाही.