हिवाळ्यात भरभरून फुलणारी ५ रोपं; ऐन थंडीत रंगबिरंगी फुलांनी बहरून जातील तुमच्या बागेतल्या कुंड्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2024 12:24 PM2024-11-16T12:24:13+5:302024-11-16T15:41:40+5:30

काही फुलझाडांच्या वाढीसाठी हिवाळा हा ऋतू अतिशय उत्तम आहे. त्यामुळे जर तुम्हाला फुलझाडांची खूप आवड असेल तर ही काही रोपं नक्की लावा. फेब्रुवारीपर्यंत त्यांचा बहर कायम राहातो.

त्यातलं सगळ्यात पहिलं फुलझाड आहे इझोरा. लाल, गुलाबी, केशरी अशा रंगाची फुलं अगदी गुच्छाने येतात. ते पाहूनच एकदम फ्रेश वाटतं.

लँटिना या रोपालाही हिवाळ्यात खूप सुंदर नाजूक फुलं येतात. लाल, गुलाबी, पांढरा, पिवळा, जांभळा या रंगाची नाजूक छोटीशी फुलं खूपच लक्षवेधी असतात.

झेंडूच्या रोपालाही या दिवसांत छान बहर येतो. एरवी कधी एवढा फुलून न येणारा झेंडू सप्टेंबर ते फेब्रुवारी या काळात मात्र भरभरून मिळताे.

ॲस्टर या फुलझाडाच्या वाढीसाठीही हिवाळा अतिशय उत्तम आहे. पांढरी, गुलाबी, जांभळी ॲस्टरची फुलं सजावटीसाठी, देवपुजेसाठी वापरली जाऊ शकतात.

मिली या रोपाला फक्त हिवाळ्यातच बहर येतो. एरवी वर्षभर त्याला फारशी फुलं नसतात. मिलीसुद्धा केशरी, गुलाबी, पांढरा या रंगात मिळते. या फुलाला सुगंध नसतो.