तब्येत लुकडीसुकडी पण पोट प्रचंड सुटलं? ५ पदार्थ खा, लवकरच वजनात दिसेल घट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 03:32 PM2023-07-13T15:32:47+5:302023-07-14T14:01:29+5:30

Top 5 Foods for Weight Loss :अनेकदा बाकी तब्येत बारीक पण पोटाचा नगारा झालेला दिसतो, अशावेळी काय करायचे?

वजन जितक्या वेगानं वाढतं तितकाच जास्तवेळ वजन कमी होण्यासही लागतो. वजन कमी करणं काही खायचं काम नाही. अनेकदा जीममध्ये तासनतास घालवून आणि डायटिंग करूनही हवातसा परीणाम दिसत नाही. अशावेळी काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रणा ठेवू शकता. या पद्धतीने वेट लॉस करण्यासाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. (Top 5 Foods for weight loss) कोणते पदार्थ रोज खाल्ल्यानं वजनावर सकारात्मक परिणाम होतो. (Foods to Eat to Help You Lose Weight)

भाजलेले चणे वजन कमी करण्यासाठीही खूप फायदेशीर ठरू शकतात. यात भरपूर फायबर, प्रोटीन आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि जास्त खाणे टाळता येते.

हेल्दी स्नॅक्समध्ये बादामाचा समावेश होतो. हे पोषक तत्वांनी परीपूर्ण आहे. ज्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. बदाम रात्री भिजवून सकाळी खाल्ल्यास उत्तम ठरते.

तुमच्या आहारात ग्रीक दही आणि बेरीचा समावेश असला तरी ते वजन झपाट्याने कमी करण्यास मदत करते. दह्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आढळतात आणि बेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, खनिजे भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व भूक कमी करण्यास मदत करतात.

सफरचंदांमध्ये भरपूर फायबर आणि कॅलरीज कमी असतात. बदाम किंवा पीनट बटरसोबत सफरचंद खाल्ल्यास हेल्दी फॅट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स शरीरात पोहोचतात. हे घटक जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करतात आणि वजन कमी करणे सोपे होते.

वजन कमी करण्यासाठी सॅलेडचा आहारात नक्कीच समावेश करा. भरपूर सॅलेड खाल्ल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. हे समृद्ध फायबर आणि जीवनसत्त्वे प्रदान करते. सॅलडमध्ये तुम्ही काकडी, टोमॅटो, गाजर आणि बीटरूटचा समावेश करू शकता. याशिवाय ब्रोकोलीसारख्या इतर भाज्याही उकळून खाऊ शकता.

वजन कमी करण्यासाठी हम्मस हा पदार्थ खूप फायदेशीर आहे. हम्मस मिसळून अनेक भाज्या खाल्ल्यास प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात वाढतात. हे सकाळी किंवा संध्याकाळी खाणे चांगले मानले जाते.

वजन कमी करण्यसाठी तुम्ही नाश्त्याला पोहे खाऊ शकतात. पोहे खाल्ल्यानं बराचवेळ भूक लागत नाही आणि पचायलाही हलके असतात.