पावसाळ्यात घरात माश्या, डास फार झालेत? 5 सोपे उपाय; अजिबात किटकांचा त्रास होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 11:51 AM2023-07-12T11:51:52+5:302023-07-12T14:29:37+5:30

Top 5 Natural Ways to Keep Insects Away : बल्ब लावल्यानंतर त्यावर किडे उडू लागले तर बल्ब वापरण्यापूर्वी कडुलिंबाची एक फांदी आणून बल्बजवळ लटकवावी. यामुळे किटक पानांच्या वासापासून दूर राहतील.

पावसाळ्यात वातावरणात गारवा पसरतो आणि घरात जास्तीत जास्त किटक दिसायला सुरूवात होते. दिवसा माश्या आणि संध्याकाळनंतर लाईट्सभोवती उडणारे किडे दिसायला लागतात. किटक आत येऊ नयेत म्हणून खिडक्या दरवाजे बंद केले तर घरात येणारी हवा बंद होते. किटकांना (Insects) दूर पळवण्यासाठी काही सोपे उपाय फायदेशीर ठरू शकतात. या टिप्सच्या मदतीनं घरात किड्यांना येण्यापासून रोखता येईल. (How to stay away from insects)

पावसाळ्यात घरात किटक येण्यापासून रोखण्याचा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे संध्याकाळी खिडक्या आणि दरवाजे बंद करा. खिडक्या आणि दरवाज्यांमध्ये खाली जागा राहणार नाही याची काळजी घ्या. (Five effective tips to prevent insects away from house in monsoon)

जिथे लाईट्सची आवश्यकता नसेल तिथल्या लाईट्स बंद करा. छत आणि खिडकीच्या जवळच्या लाईट्स नेहमी बंद ठेवा. किडे नेहमी या ठिकाणी जास्त येतात.

किटकांना पळवून लावण्यासाठी लिंबू आणि बेकींग सोड्याचं मिश्रण (Baking Soda) बनवून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. हे मिश्रण किटकांवर लावा. जेणेकरून किडे लांब पळतील.

पावसाळ्यात किड्यांना (Monsoon Insects) पळवून लावण्यासाठी काळ्या मिरीचा स्प्रे वापरू शकता. काळी मिरी कुटून पाण्यात मिसळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून किड्यांवर शिंपडा.

घरात जितकी जास्त स्वच्छता असेल तितकेच किटक कमीत कमी दिसून येतील. जास्तीत जास्त किडे अस्वच्छ घरात दिसून येतात. पावसाळ्यात किटकांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही इसेंशियल ऑईलचाही वापर करू शकता.

बल्ब लावल्यानंतर त्यावर किडे उडू लागले तर बल्ब वापरण्यापूर्वी कडुलिंबाची एक फांदी आणून बल्बजवळ लटकवावी. यामुळे किटक पानांच्या वासापासून दूर राहतील.