सापांना दूर ठेवणारी ५ रोपं, सापांचा धोका टाळायचा तर 'ही' झाडं अंगणात नक्की लावा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2024 12:42 PM2024-03-04T12:42:02+5:302024-03-04T12:49:57+5:30

काही भागांमध्ये साप असण्याचं प्रमाण जास्त असतं. फ्लॅट संस्कृतीमध्ये तसा त्रास नसला तरी ज्यांच्याकडे घराभोवती मोकळी, ऐसपैस जागा आहे, अशा ठिकाणी अनेक जणांना साप येण्याचा धोका वाटतो.

म्हणूनच तुमच्याही भागात सापांचा धोका असेल तर त्यांना दूर ठेवणारी ही काही रोपं तुमच्या अंगणात, घरासमोरच्या बागेत नक्की लावा.

यापैकी सगळ्यात पहिलं आहे झेंडुचं रोप. झेंडूच्या वासाने साप त्या भागात फिरकत नाहीत.

स्नेक प्लांट पासूनही स्नेक म्हणजेच साप दूर राहतात. पण यासाठी स्नेक प्लांटची उंच वाढणारी व्हरायटी लावावी.

गवती चहाच्या वासानेही साप दूर राहतात. सापांपासून सुरक्षितताही मिळेल आणि गवती चहाचे आरोग्यदायी लाभही घेता येतील.

घराभोवती लसूण जर लावला तर त्याच्या उग्र वासानेही साप घराच्या आसपास फिरकणार नाहीत.

लसूणाप्रमाणेच कांद्याचा उपयोगही सापांना दूर ठेवण्यासाठी होतो.