हँगिंग बास्केटमध्ये लावण्यासाठी ६ सदाबहार रोपं, बघा कसं सुंदर सजेल तुमचं टेरेस गार्डन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2023 12:15 PM2023-11-18T12:15:35+5:302023-11-18T12:28:04+5:30

जागा कमी असेल तर हँगिंग बास्केटमध्ये रोपं लावून तुम्ही तुमची गार्डनिंगची हौस भागवू शकता. शिवाय वेगवेगळ्या फुलांनी- झाडांनी सजलेल्या हँगिंग बास्केटमुळे तुमच्या टेरेसचा किंवा गार्डनचा लूकही बदलून जातो.

आता असे कोणते हँगिंग प्लॅन्ट्स आपण टेरेसमध्ये, गॅलरीमध्ये लावू शकतो, ते पाहूया.. ही सगळीच रोपे अगदी सहज वाढतात. त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज पडत नाही.

यापैकी सगळ्यात पहिलं आहे मनीप्लँट. मनीप्लँटचे वेगवेगळे प्रकार तुम्ही हँगिंग बास्केटमध्ये लावू शकता. गार्डनला वेगळा लूक येईल.

चिनी गुलाबही हँगिंग बास्केटमध्ये लावायला छान आहे. वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी तो बहरून गेल्यावर गार्डनला खूप छान लूक येईल.

तसंच ऑफिस टाईम या रोपट्याचंही आहे. वेगवेगळ्या रंगांची ऑफिस टाईमची रोपं आणूनही तुम्ही तुमचं छोटंसं हँगिंग गार्डन सजवू शकता.

बोस्टन फर्न हे रोपही हँगिंग बास्केटमध्ये आपण लावतो तेव्हा चहुबाजुंनी छान फुलून येतं.

वंडरिंग ज्यू प्लॅन्ट्सचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. यातले सगळेच प्रकार किंवा तुम्हाला आवडणारा एकच प्रकार लावूनही तुम्ही टेरेस सजवू शकता.

स्पायडर प्लान्टही लटकणाऱ्या कुंड्यांमध्ये छान दिसतं.