कोण म्हणतं प्रोटिन्ससाठी खूप खर्च लागतो? 'हे' ६ व्हेज पदार्थ खा, हाडं-मसल्स होतील मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 09:08 AM2023-09-16T09:08:00+5:302023-09-16T13:41:54+5:30

Top 6 High Protein Veg foods : डाळीत जवळपास २५ टक्के प्रोटीन असते.

ज्याचं वजन जास्त आहे किंवा शरीरावर अजिबात मांसच नाही अशा प्रत्येकासाठीच प्रोटीन गरजेचं असतं स्नायूंच्या विकासापासून, हाडांच्या मजबूतीसाठी प्रोटीन्स गरजेचे असतात. शरीरात प्रोटीन्सची कमतरता उद्भवल्यास वजन कमी होणं, मांसपेशी कमकुवत होणं, हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होणं अशी लक्षणं जाणवतात. (Top 6 High Protein veg foods for muscle growth)

कमकुवतपणा, थकवा येणं, शरीरात सूज येणं, इम्यून सिस्टिम कमकुवत होणं, केस आणि नखांच्या समस्या उद्भवतात. फक्त मांसाहारातून भरपूर प्रोटीन मिळतं असा अनेकांचा समज असतो पण काही व्हेज पदार्थ नियमित खाल्ल्यास प्रोटीन्सची कमतरता दूर होऊ शकते.

डाळीत जवळपास २५ टक्के प्रोटीन असते. यात फायबर्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्स असतात. इतर डाळींच्या तुलनेत मुगाच्या डाळीत सर्वाधिक प्रोटीन असते.

चिया सिड्स प्रोटीन्सचा एक चांगला स्त्रोत आहे यात १५ ते १७ टक्के प्रोटीन असते. हे एक हेल्दी फॅट्सयुक्त अन्न आहे.

भोपळ्याच्या बीया या प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहेत. यात जवळपास ३० टक्के प्रोटीन्स असतात. याशिवाय हेल्दी फॅट, यात असतात.

ग्रीक योगर्ट एक डेअरी उत्पादन आहे. यात दह्याच्या तुलनेत अधिक प्रोटीन्स असतात. साधारणपणे १० ते १५ ग्राम प्रोटीन्स असतात.

पनीरमध्ये भरभरून प्रोटीन्स असतात. १ कप पनीरमध्ये १२ ग्राम प्रोटीन असते. प्रोटिन्स व्यतिरिक्त कॅल्शियमचाही उत्तम सोर्स आहे.

ब्रोकोलीमध्ये अन्य भाज्यांच्या तुलनेत प्रोटीन्स जास्त असतात. ही भाजी प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहे. एक कप कच्च्या ब्रोक्रोलीमध्ये जवळपास २.६ ग्राम प्रोटीन्स असतात.