ब्लाऊज-पंजाबी ड्रेसच्या गळ्याला लावा लटकन, रंगबिरंगी-नाजूक लटकनचे पाहा मनमोहक डिझाइन्स! ड्रेस कमाल सुंदर... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2024 07:21 PM 2024-10-18T19:21:24+5:30 2024-10-18T19:34:27+5:30
Simple and Beautiful Latkan Design : Latest Blouse and punjabi suit dress Latkan : Top Latkan Designs : ब्लाऊज, पंजाबी ड्रेसचे गळे सुंदर आणि छान दिसावेत म्हणून तुम्ही कोणत्या प्रकारची लटकन लावणार? ब्लाऊज, पंजाबी ड्रेस सूटचे गळे अधिक आकर्षक दिसावेत म्हणून आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लटकन लावतो. या आऊटफिट्सना लटकन लावल्याने ते खूप सुंदर आणि उठून दिसतात. शक्यतो कोणताही खास प्रसंग, सण - समारंभ अशावेळी घालायच्या हेव्ही वर्क, डिझाइन्स, पॅटर्न असणाऱ्या कपड्यांना आपण लटकन लावून घेतो. बाजारांत वेगवेगळे रंग, आकार, पॅटर्न असणाऱ्या लटकन अगदी सहजपणे उपलब्ध होतात. अनेकजणी आपल्या ड्रेसला मॅचिंग किंवा काँट्रास्ट रंगाच्या लटकन लावणे पसंत करतात. येणाऱ्या दिवाळी सणासाठी जर आपण कपडे शिवत असाल तर ब्लाऊज, पंजाबी ड्रेस सूटचे गळे आणखीन सुंदर आणि छान दिसावेत यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या लटकनचा वापर करु शकता(Top Latkan Designs).
१. पिलो पेंडंट लटकन :- या प्रकारामध्ये लटकनला अशा छोट्या आकाराच्या उशा असतात म्हणून यांना 'पिलो पेंडंट लटकन' असे म्हणतात. यात विविध पॅटर्न आणि नाजूक भरतकाम केलेले फॅन्सी डिझाईन्स मिळतील. अशा प्रकारची लटकन शक्यतो ब्लाऊजला लावली जाते, ब्लाऊज बॅकलेस असेल तर लटकन लावल्याने तो अधिकच छान दिसेल. यामध्ये तुम्ही तुमच्या ब्लाऊजनुसार रंग खरेदी करू शकता. अशा प्रकारची लटकन बाजारात १०० ते २०० रुपयांपर्यंत अगदी सहज मिळेल.
२. मोती वर्क लटकन :- पांढरेशुभ्र मोती वर्कचे डिझाइन्स असणारे लटकन खूप सुंदर दिसतात. जर आपल्या ड्रेसवर किंवा ब्लाऊजवर मोती वर्कचे डिझाइन असेल तर आपण त्याला ही मोती वर्क लटकन मॅच करू शकता. फॅन्सी बॅक ब्लाऊजसोबत देखील या पॅटर्नची लटकन खूप चांगली दिसेल. हे लटकन तुम्हाला बाजारात १०० ते ३०० रुपयांपर्यंत मिळेल.
३. मिरर वर्क लटकन :- आपण असे बाजारांत विकत मिळणारे मिरर आणि लोकरीपासून तयार केलेले मिरर वर्क आणि गोंड्याचे डिझाइन्स असणारे लटकन देखील विकत घेऊ शकता. असे लटकन आपल्याला बाजारात १०० ते २०० रुपयांपर्यंत सहज विकत मिळतील.
४. कापडाचे लटकन :- जर आपल्याला खूप हेव्ही किंवा कोणतेही वर्क नसणारे साधे लटकन हवे असतील तर आपण असे कापडाचे लटकन विकत घेऊ शकता. कापडाचे लटकन आपण ब्लाऊज किंवा ड्रेस शिवून उरलेल्या कापडात देखील शिवून लावू शकता.
५. धागा वर्क लटकन :- धागा वर्क लटकन हा लटकनचा अतिशय फेमस प्रकार आहे. यावर वेगवेगळ्या रंगांच्या धाग्यांचे नाजूक नक्षीकाम केलेले असते. या धाग्यांच्या नक्षीकामामुळेच हे लटकन अधिक उठून दिसतात .
६. कस्टमाइज टेक्स लटकन :- कस्टमाइज टेक्स लटकन हे आपल्याला स्वतःला वेगळे खास तयार करून घ्यावे लागतात. कारण या लटकन प्रकारामध्ये आपण आपल्या आवडीनुसार आपले नाव किंवा इतर प्रकारचा अगदी लहानसा मजकूर लिहू शकतो. असे कस्टमाइज टेक्स लटकन तयार करून देणारे अनेकजण आपल्याला बाजारात सहज मिळतील. या प्रकारचे लटकन हे थोडे महाग असतात.
७.कुंदन वर्क पॅटर्न लटकन :- कुंदनच्या लहान टिकल्या लावून देखील अतिशय आकर्षक असे लटकन तयार केले जातात. जर तुमच्या ड्रेस आणि ब्लाऊजवर कुंदन वर्क असेल तर आपण असे कुंदन वर्क पॅटर्नचे लटकन मॅच करू शकतात.
८. डायमंड वर्क लटकन :- या प्रकारच्या लटकनमध्ये डायमंड वर्क केलेले असते. जर ड्रेस किंवा ब्लाऊजवर डायमंड वर्क असेल तर आपण डायमंड वर्कचे लटकन घेऊ शकता. असे लटकन आपल्याला २०० ते ३०० रुपयांपर्यंत विकत मिळतील.