Traditional Jewellery Ideas : गणपतीत काठापदराच्या साड्यांवर ट्राय करा पारंपारीक, स्टायलिश दागिने, पाहा लेटेस्ट पॅटर्न्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 09:54 AM2022-08-30T09:54:00+5:302022-08-30T09:55:01+5:30

Traditional Jewellery Ideas :

ऐरवी बायकांना साडी नेसण्याचा कंटाळा येत असला तरी सण उत्सव म्हणलं की आनंदानं सगळ्या पारंपारीक पोशाखांकडे वळतात. भारतीय संस्कृती साडीला खूप महत्व आहे. आपल्या प्रत्येकाच्याच घरातील स्त्रिया सणावाराला साड्या नेसतात. (traditional jewellery for ganesh chaturthi)

या साड्यांवर साजेसे दागिने कोणते घालता येतील, कोणत्या गेटअपमध्ये आपण उठून दिसू असा प्रश्न अनेकींना पडलेला असतो. या लेखात काठापदराच्या साड्यांवर किंवा हिरकणी, खणांच्या साड्यांवर सुट होतील असे काही दागिने, पाहूया

गोल्डन किंवा मोत्यांचे दागिने अशी थिम ठरवून द्याप्रमाणे लूक क्रिएट करा.

साडीवर तुम्ही लॉग्न नेकलेसही वेअर करू शकता.

जर तुम्हाला गळ्यात जास्त काही घालायला आवडत असेल तर एकच थोडा जाडसर नेकलेस निवडू शकता.

याप्रकारचे नेकलेस तुम्हाला कोणत्याही साडीवर उठून दिसतील.

तुमंच बजेट थोडं जास्त असेल तर तुम्ही साऊथ इंडियन स्टाईल टेम्पल ज्वेलरीसुद्धा घालू शकता.

मध्ये गुलाबी खडा आणि गोल्डन रंग असलेली ठुशी तुम्ही कोणत्याही साडीवर घालू शकता.