दसऱ्याला हवाच नथीचा नखरा! बघा १ ग्रॅम सोन्याच्या नथींचे सुंदर डिझाईन्स, पाहा कोणती घालायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2023 09:28 AM2023-10-22T09:28:43+5:302023-10-22T09:41:24+5:30

दसऱ्याच्या दिवशी किंवा लवकरच येणाऱ्या दिवाळीसाठी पारंपरिक मराठी लूक करायचा असेल तर नाकात घालायला सुंदर नथ पाहिजेच.

म्हणूनच तुमचाही यावर्षी नथ घेण्याचा विचार असेल तर हे काही लेटेस्ट डिझाईन्स बघून घ्या. १ ग्रॅममध्ये या खूप छान नथ उपलब्ध आहेत.

हे डिझाईन आपल्या पारंपरिक नथसारखंच आहे. फक्त त्याच्या मधोधम असणारी रेषा थोडी वेगळी आहे. अनेकींना टिपिकल नथ डिझाईनच आवडतं. त्या या नथीचा विचार नक्कीच करू शकतात.

नथीमध्ये मोराचं डिझाईन आपण नेहमीच पाहतो. आता ही मासोळी नथ बघा. सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं घ्यायचं असेल तर हा एक चांगला पर्याय आहे.

मोराच्या नथीमध्ये हा एक सुंदर प्रकार आला आहे. नथ नाकात घातल्यावर मोराचा पिसारा अगदी ठसठशीत उठून दिसेल.

मोराच्या डिझाईनमध्ये काही वेगळं पाहायचं असेल तर हा एक प्रकार मिळू शकतो.

छोटंसं फूल आणि त्याला वेल... हे आणखी एक ठसठशीत डिझाईन.

खूप मोठी नथ आवडत नसेल तर या नाजूक नथीचा विचार करू शकता. नाजूक असली तरी ते ट्रेण्डी- स्टायलिश आहे.

संपूर्णपणे मोत्याचीच नथ हवी असेल तर हे एक छान डिझाईन आहे.