साडीवर फॅशनेबल ब्लाऊज शिवायचंय? बघा मागच्या गळ्याचे ९ स्टायलिश डिझाइन्स- साडी नेसून दिसाल ग्लॅमरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2024 11:37 AM2024-09-29T11:37:30+5:302024-09-29T17:09:57+5:30

Trending Single Blouse Back Design - Check out Trendy Design : ब्लाऊज सुंदर नसेल तर सुंदर साडीही ग्लॅमरस दिसत नाही, म्हणून या घ्या काही आयडिया

अनंत चतुर्दशीनंतर, एकामागोमाग एका सणावाराला सुरुवात होते. आता काही दिवसात नवरात्र मग दसरा आणि दिवाळीची रेलचेल सुरु होईल. यादिवसात महिलावर्ग आवर्जुन साडी खरेदी करतात. साडीमध्ये देखील वैविधता पाहायला मिळते. विविध प्रकारचे फॅशनेबल साड्या कोणाला नाही आवडत(Trending Single Blouse Back Design - Check out Trendy Design).

फॅशनेबल साड्यांवर फॅशनेबल ब्लाउजही हवेच. जर आपल्याला ट्रेण्डी ब्लाउज शिवायचं असेल तर, ९ प्रकारचे डिझाईन पाहा. आपल्याला हे ब्लाउज डिझाईन नक्कीच आवडतील.

लेटेस्ट फॅशनचं ब्लाऊज डिझाईन असेल तर, लटकनऐवजी दोरीवर वेगळी डिझाईन करा. आपण दोरीवर फुलांची डिझाईन करू शकता. यामुळे ब्लाउजला वेगळा लूक येईल.

मागच्या गळ्याचा आकार आपण कोणत्याही पद्धतीने तयार करू शकता. त्याच्या भोवतीने विविध प्रकारचे बॉर्डर लावा. बॉर्डरमुळे मागच्या गळ्याला नवीन लूक येईल.

जर आपल्याला रिच लूक हवा असेल तर, मागच्या गळ्याला खड्यांनी सजवा. बॉर्डरला देखील खडे, मोती किंवा सोनेरी रंगाची लेस लावा.

मागच्या गळ्याला आपण व्हि नेक, बोट किंवा वेगळ्या टाईपचे आकार देऊन आवडीचे लटकन लावू शकता.

आजकाल पतीचे नाव ब्लाऊजवर लिहायलची फॅशन बरीच ट्रेण्डमध्ये आहे. आपण ब्लाउजच्या बॅक साईडला नेटने कव्हर करून त्यावर नाव लिहू शकता.

हल्ली अशा प्रकारचं ब्लाऊजही खूप पाहायला मिळतं. हे गळ्याचं जे पॅचवर्क आहे. आपण बाजारातून विशेष कापड विकत आणून अशा प्रकारचे ब्लाउज तयार करू शकता. असे ब्लाउज फक्त साडीवर नसून, घागऱ्यावरही शोभून दिसतील.

आपली साडी काठपदराची किंवा साधी असेल तर, ब्लाउजचा मागचा गळा आपण लेस लावून फॅशनेबल तयार करू शकता. आजकाल बाजारात बऱ्याच प्रकारचे लेस उपलब्ध आहेत.