काठापदराच्या जुन्या साड्या नेसून कंटाळा आला? बघा साड्यांचे ड्रेसचे ८ पॅटर्न, दिवाळीसाठी सुंदर ड्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 04:08 PM2022-10-15T16:08:39+5:302022-10-15T16:13:25+5:30

१. काठपदराच्या साड्या जुन्या झाल्या तरी आपलं त्यांच्यावरचं प्रेम काही कमी होत नाही. त्यामुळे मग या साड्या आपण कोणाला देऊनही टाकत नाही आणि शिवाय दरवेळी तिच ती साडी नेसूही शकत नाही. अशावेळी या साड्यांचा छान, नव्या फॅशननुसार उपयोग करायचा असेल तर त्याचे असे मस्त ड्रेस तुम्ही शिवू शकता.

२. काठपदराच्या साड्यांपासून तयार केलेल्या ड्रेसचे अनेक नवेनवे पॅटर्न आलेले आहेत. शिवाय ते ड्रेस ट्रॅडिशनल आणि ट्रेण्डी दिसतात. शाळकरी मुली, कॉलेज तरुणी यांनाही हे ड्रेस खूप शोभून दिसतात. त्यामुळे असे काही प्रकार तुम्ही तुमच्या मुलींसाठीही शिवू शकता.

३. अशा प्रकारचं एकदम हटके आणि फॅशनेबल आऊटफिटही तुम्ही टिपिकल काठपदर साडीपासून शिवू शकता.

४. साडीचा लेहेंगा, साडीच्या काठाचं ब्लाऊज आणि त्यावर मॅचिंग ओढणी विकत आणली तर अशा प्रकारचा ड्रेस होऊ शकतो. दिवाळीला किंवा लग्नकार्यात घालायला हा ड्रेस शोभून दिसेल.

५. हा एक अगदी सिंपल पण तेवढाच आकर्षक ड्रेस.. अशा प्रकारच्या चौकडीच्या साडीपासून किंवा दुसऱ्या कोणत्या खूप हेवी वर्क नसणाऱ्या साडीपासून तुम्ही हा ड्रेस शिवू शकतात. इरकल साड्यांपासून जर हा प्रकार तयार केला तर तो अधिक छान दिसेल.

६. एकमेकांना कॉन्ट्रास्ट मॅच होणाऱ्या २ साड्या असतील, तर त्यांच्यापासून अशा पद्धतीचा ड्रेस शिवता येऊ शकतो. ड्रेस एवढा सुरेख दिसेल की तो जुन्या साड्यांपासून शिवला आहे, हे कुणाला सांगूनही खरे वाटणार नाही.

७. अशाच पद्धतीने हा ड्रेसही शिवता येतो. यासाठी पण एकमेकांच्या विरुद्ध रंग असणाऱ्या २ साड्या तुमच्याकडे पाहिजेत.

८. सिल्क कॉटन प्रकारात येणाऱ्या साड्यांपासून शिवलेला असा ड्रेसही खूप आकर्षक दिसतो.

९. एखाद्या साडीचा वर दाखवल्याप्रमाणे अनारकली कुर्ता शिवायचा आणि त्यावर हेवी वर्क असणारी ओढणी विकत आणायची. कुर्त्याची लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी- जास्त शिवू शकता.