फक्त वाटीभर बेसन पिठात मिसळा 'हे' ६ पदार्थ, विकतचे फेसमास्क जाल विसरुन - त्वचा दिसेल सुंदर....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2025 14:00 IST2025-03-19T13:52:26+5:302025-03-19T14:00:47+5:30

How To Use Besan In 6 Different Way On Skin To Cure All Skin Problems : 6 Easy to Make Besan Face Packs for All Skin Types : Try These 6 Amazing Besan Face Packs to Get Healthy, Glowing Skin : त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांनुसार बेसन पिठात काय मिसळणे आहे योग्य, ते पाहा...

त्वचेसाठी बेसनाचा (6 Easy to Make Besan Face Packs for All Skin Types) वापर फार पूर्वी पासून केला जात आहे. त्वेचेसाठी कोणताही घरगुती उपाय करायचा म्हटलं की त्यात बेसन आलेच. बेसन पिठाचा त्वचेसाठी (Try These 6 Amazing Besan Face Packs to Get Healthy, Glowing Skin) वापर करताना आपण बेसनसोबतच इतरही पदार्थ त्यात मिसळून लावतो. त्वचेसाठी बेसन पिठाचा वापर करताना त्यात नेमके कोणते पदार्थ मिसळून लावणे त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरेल, ते पाहूयात.

बेसन पिठात हळद मिक्स करून लावल्याने त्याचे आपल्या त्वचेसाठी दुप्पट फायदे होतात. बेसन पिठात हळद मिसळून लावल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. याशिवाय, त्वचेवरील पिंपल्स, काळे डाग कमी होण्यास मदत होते. हळदीत असणाऱ्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे त्वचा खोलवर स्वच्छ केली जाते.

ज्यांची स्किन खूप ऑयली किंवा तेलकट आहे त्यांनी त्वचेसाठी बेसन पिठाचा वापर करताना त्यात दही मिसळणे फायदेशीर ठरेल. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही बेसन पिठात दही मिसळू शकतात. दह्यामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. बेसन आणि दह्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याचा रंग आणि पोत सुधारतो. दह्यात लॅक्टिक अ‍ॅसिड असते. यामुळे त्वचा ग्लोईंग होऊन मऊ-मॉईश्चराईज आणि चमकदार बनते.

एलोवेरा जेलमध्ये त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चरायझिंग करण्याचे गुणधर्म असतात. यासाठी बेसन पिठात एलोवेरा जेल मिक्स केल्याने रुक्ष, कोरड्या, निर्जीव त्वचेला ओलावा मिळतो आणि त्वचा हायड्रेटेड होते.

बेसन पिठात मध मिक्स करून लावणे त्वचेला अधिक फायदेशीर ठरते. मधामुळे त्वचा कोरडी, रुक्ष, निस्तेज होत नाही, तसेच त्वचेला ओलावा मिळून त्वचा मॉइश्चराईझ केली जाते.

बेसन पीठ आणि मुलतानी माती यांचे एकत्रित मिश्रण म्हणजे उत्तम स्क्रब आहे. त्वचेचे स्क्रबिंग करून डेड स्किन काढून टाकून त्वचा खोलवर स्वच्छ करण्याचे काम मुलतानी माती करते. यामुळे बेसन पिठात मुलतानी माती मिसळणे त्वचेसाठी फायदेशीर ठरते.

उन्हाळ्याच्या दिवसांत टॅनिंग झालेल्या किंवा काळवंडलेल्या त्वचेचा रंग सुधारण्यासाठी बेसन पिठात काकडीचा रस मिसळणे फायदेशीर ठरते. उन्हामुळे डल, निस्तेज झालेल्या त्वचेला पुन्हा रिफ्रेश करण्यासाठी बेसन पीठ आणि काकडीचा रस यांचा एकत्रित फेसपॅक वापरणे अधिक उपयोगी ठरते.