आई होण्यासाठी किती वेदना सहन केल्या! एक - दोनदा नाही कित्येकदा IVF अपयशी, ७ अभिनेत्रींची कथा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2023 11:20 AM2023-03-05T11:20:52+5:302023-03-06T12:05:44+5:30

TV Celebrities Who Spoke About Pregnancy Struggle : आपल्याप्रमाणेच काही अभिनेत्रीही गर्भधारणेसारख्या नाजूक गोष्टीला सामोऱ्या जात असतात. त्याबाबत मोकळेपणाने शेअर करणाऱ्यांविषयी...women's day special

मूल होणे ही अतिशय सुंदर आणि तितकीच नाजूक गोष्ट. काही वेळा या प्रक्रियेत अडचणी आल्या की तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आपण मूल होण्यासाठी प्रयत्न करतो. आयव्हीएफ, टेस्ट ट्यूब बेबी यांसारख्या उपचारपद्धतींचा वापर करुन आपण मूल होण्यासाठी प्रयत्न करतो. आपल्याप्रमाणेच काही अभिनेत्रीही या सगळ्याला सामोऱ्या जात असतात. काही जणी त्याबाबत मोकळेपणाने बोलून आपले अनुभव शेअर करतात (TV Celebrities Who Spoke About Pregnancy Struggle).

शार्क टँक इंडियामध्ये जज असलेली नमिता थापर सांगते, १ मूल होते, पण दुसरे हवे होते. त्यासाठी २ वेळा आयव्हीएफ केले. यासाठी १-२ नाही तर २५ इंजेक्शन घेतले. या सगळ्या दरम्यान झालेल्या भावनिक आणि शारीरिक जखमा कायम लक्षात राहतील अशा होत्या. ती म्हणते २ वेळा प्रयत्न केल्यानंतर मला मूल नको असे वाटले म्हणून मी उपचार सोडून दिले आणि एक दिवस अचानक नैसर्गिकरित्या मला गर्भधारणा झाली.

देबिना आपल्या मूल होण्याच्या संघर्षाबाबत अतिशय मोकळेपणाने व्यक्त होते. पहिल्यांदाच मूल होण्यासाठी देबिनाने ४ वेळा आयव्हीएफ आयव्हीएफ ट्रीटमेंट घेतली. मात्र सगळ्या वेळी ही ट्रीटमेट फेल गेली. अखेर पाचव्यांदा तिच्या प्रयत्नांना फळ आले आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतरही तिला एक मुलगी झाली.

बॉलिवूड बललला मुलाखत देताना माहि म्हणाली, आपण अनेकदा आयव्हीएफ उपचार केले. मात्र तारा हा तिने केलेला शेवटचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला.

ती सांगते मी तब्बल १४ वेळा आयव्हीएफ केलं आणि त्या सगळ्या वेळा ते फेल झालं. त्यानंतर मी आणि कृष्णा अभिषेक याने सरोगसी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सगळ्या काळात माझ्या शरीराचे खूप हाल झाले असेही कश्मिरा म्हणते. १४ वेळा आयव्हीएफ केल्यावर तिच्या शरीराचे काय झाले असेल याची आपण कल्पना करु शकतो.

गर्भधारणा व्हावी यासाठी आपण खूप संघर्ष केला असे संभावना सांगते. आयव्हीएफ ४ वेळा फेल झाले आणि त्यामुळे आपली अतिशय वाईट अवस्था झाली असं संभावना सांगते.

गर्भधारणा होत नसल्याचे पायलने एका शो मध्ये सांगितले. अनेकदा फेल होणाऱ्या आयव्हीएफ प्रक्रिया आणि त्यामुळे येणारा ताण याबाबतही ती मोकळेपणाने बोलली.

प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि निर्माती असलेली एकता कपूर सरोगसीने आई झाली हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण त्याआधी तिने आयव्हीएफ उपचार घेतले होते पण ते अपयशी झाले होते. बरेचदा आयव्हीएफ करुनही त्यामध्ये अपयश आल्याने अखेर एकताने सरोगसीचा निर्णय घेतल्याचे तिच्या डॉक्टरांनी सांगितले.