सोन्याचं नेकलेस तर घ्यायचं पण बजेट कमी? पाहा १० नवीन डिझाइन्स-कमी वजनात मिळेल सुंदर दागिना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 02:56 PM2024-11-27T14:56:21+5:302024-11-27T16:15:51+5:30

Unique Gold Necklace Designs for weddings : १० ते १५ ग्रॅममध्ये तुम्हाला नेकलेसच्या सुंदर डिजाईन्स पाहायला मिळतील.

लग्न समारंभात किंवा खास प्रसंगात महिला गळ्यात नेकलेस घालतात. सोन्याचा छोटा नेकलेस घातल्यानंतर गळा भरलेला दिसतो. त्यामुळे तुम्हाला गळ्यात फार काही घालण्याची आवश्यकता नाही.

१० ते १५ ग्रॅममध्ये तुम्हाला नेकलेसच्या सुंदर डिजाईन्स पाहायला मिळतील. तुम्ही हव्या त्या डिजाईन्समध्ये नेकलेस बनवून घेऊ शकता.

यात काही नाजूक पॅटर्न्स असे आहेत जे तुम्ही वेस्टर्न वेअर, पार्टी वेअरवरही घालू शकता.

नेकलेसमध्ये पानांच्या डिजाईन्सही उठून दिसतात. या डिजाईन्समध्ये तुम्ही गुलाबी स्टोन्स लावू शकता.

जर तुम्हाला थोडा मोठा नेकलेस हवा असेल तर तुम्ही लटकनसारखे डिजाईन्स निवडू शकता.

नेकलेसच्या पेंडंटमध्ये फुल अगदी शोभून दिसते. फुलाफुलांच्या डिजाईनमुळे गळा उठून दिसतो.

नेकलेसमध्ये हे पॅटर्न नवीन आहे. रोजच्या वापरासाठीही नाजूक, सुंदर दिसते

नेकलेसवर कानातल्यांच सेटसुद्धा उपलब्ध होईल.

जर तुम्हाला बारीक चेन हवी असेल तर तुम्ही अशा डिजाईन्स ट्राय ककरू शकता.

(Image Credit -Social Media)