आलं आहे की जादू? चेहऱ्याला ‘असं’ लावा आलं-ॲक्ने-पिपल्स जाऊन त्वचा चमकेल रोज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2025 17:58 IST2025-04-11T15:19:34+5:302025-04-11T17:58:37+5:30

आलं आपल्या स्वयंपाक घरात नेहमीच असतं. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये जेव्हा आपण आलं घालतो तेव्हा त्या पदार्थाची चव जास्त खुलते यात वादच नाही...
चहामध्ये तर कित्येकांना आलं हवंच असतं.. थंडी आणि रिमझिम बरसणाऱ्या पावसात आलं घालून केलेला चहा हातात आला तर क्या बात है.. पण हे आलं असं फक्त स्वयंपाकापुरतंच मर्यादित ठेवू नका..(use of ginger for glowing skin)
कारण तुमचं सौंदर्य खुलविण्यासाठीही ते खूप जास्त उपयुक्त ठरतं. त्याचे नेमके काय फायदे आहेत आणि ते कशा पद्धतीने वापरावं याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ mansifaceyoga या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.(how to use ginger for removing pimples, acne and pigmentation?)
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की आल्याचा एक तुकडा घेऊन त्याचा रस चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा.. आठवड्यातून एकदा जरी हा उपाय केला तरी त्याचे खूप लाभ होतील..
आल्याचा रस नियमितपणे चेहऱ्यावर लावल्यास ॲक्ने, पिंपल्स कमी होतात.
कमी वयात त्वचेवर बारीक सुरकुत्या येण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. हा त्रास कमी करण्यासाठी आल्याचा रस नियमितपणे त्वचेवर लावून मालिश करा.
आल्याचा रस त्वचेला लावून मालिश केल्यामुळे त्वचेमधले रक्ताभिसरण अधिक चांगले होते. त्यामुळे त्वचेवर छान ग्लो येतो.
पिगमेंटेशन तसेच पिंपल्स येऊन गेल्यानंतर त्वचेवर राहणारे त्याचे काळे डाग कमी करण्यासाठीही आल्याचा रस उपयुक्त ठरतो.
काही लोकांना डोळ्याखाली सुजल्यासारखे असते. यालाच puffy eyes म्हणतात. हा त्रास कमी करण्यासाठीही आल्याचा रस उपयोगी येतो.
त्वचेवर इंस्टंट ग्लो येण्यासाठी आल्याचा रस आणि मध असा फेसपॅक तुम्ही वापरू शकता.