फक्त १ चमचा हळद केसांवर करेल कमाल, केस होतील दाट- लांब, बघा कसा करायचा वापर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2024 11:59 AM 2024-04-26T11:59:17+5:30 2024-04-26T12:05:59+5:30
केसांच्या कोणत्याही तक्रारी असतील तर त्यांच्यावर इतर कोणतंही कॉस्मेटिक्स लावण्याच्या आधी हळदीचा वापर करून हे काही घरगुती उपाय करून पाहा.
हळद त्वचेसाठी अतिशय गुणकारी असते. त्यामुळे वेगवेगळ्या फेसपॅकमध्येही आपण हळद वापरतो. आता केसांसाठी हळदीचा वापर करून पाहा. (Use of turmeric or haldi for long and strong hair)
हळदीमध्ये असणारे ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टीफंगल गुणधर्म तसेच तिच्यातले इतर काही घटक केसांमधला कोंडा, दुर्गंधी कमी करतात. शिवाय केस दाट- लांब होण्यासाठीही हळदीचा हेअर पॅक अतिशय उपयुक्त ठरतो. (turmeric hair pack for promoting hair growth)
Journal of Controlled Release यांच्या अभ्यासानुसार हळदीचा हेअरपॅक लावल्याने केसांची मुळं पक्की होतात आणि केस गळण्याचं प्रमाण कमी होतं.
डोक्याची त्वचा म्हणजे स्काल्प निरोगी असेल तर केसांना व्यवस्थित पोषण मिळतं आणि त्यांची चांगली वाढ होण्यास मदत होते. डोक्याच्या त्वचेचं आरोग्य सुधारण्याचं काम हळद उत्तम करते. यामुळे केस दाट, लांब होण्यास मदत होते.
हळदीचा हेअरपॅक तयार करण्यासाठी २ टेबलस्पून हळद, १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल आणि १ टेबलस्पून दही एका भांड्यात एकत्र कालवून घ्या. हा पॅक केसांच्या मुळांशी लावा आणि अर्ध्या तासाने केस धुवून टाका. यामुळे केसांची मुळं पक्की होतात, शिवाय केसांवर छान चमक येते.
१ टेबलस्पून हळद तुमच्या नेहमीच्या शाम्पूमध्ये टाका आणि त्याने केस धुवा. यामुळे स्काल्पचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच कोंडाही कमी होतो.
पाव वाटी ऑलिव्ह ऑईल घ्या. त्यात २ टी स्पून हळद टाकून तेल कोमट करून घ्या. या कोमट तेलाने रात्री केसांच्या मुळाशी हळूवार मसाज करा. त्यानंतर सकाळी केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय नियमितपणे केल्यास केस गळणं बरंच कमी होईल.