त्याला 'I Love You' म्हणायची हिंमत होत नाही? मग हातावरची मेहेंदी दाखवून हटके स्टाईलने द्या प्रेमाची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2024 09:13 AM2024-02-13T09:13:54+5:302024-02-13T09:15:01+5:30

बऱ्याचदा असंही होतं की तिला तो खूप आवडत असतो. त्यामुळे व्हॅलेंटाईन्स डे ला तिलाच त्याला प्रपोज करायचं असतं. किंवा त्याने तिला प्रपोज केलं तर हिला त्याला हो म्हणायचं असतं.

पण या दोन्ही गोष्टी करण्यासाठी हिंमतच होत नाही. त्याच्यासमोर गेल्यावर काय बोलावं हेच सुचत नाही. तुमच्याही बाबतीत असंच होत असेल त्याला I Love You म्हणायची हिंमत होत नसेल किंवा मग त्याच्या प्रपोजलला तुम्हाला काही हटके पद्धतीने उत्तर द्यायचं असेल तर फक्त हातावरची मेहेंदी दाखवून द्या..

तुमच्या भावना त्याच्यापर्यंत आपेआप पोहोचविण्याचं उत्तम माध्यम म्हणजे मेहेंदी. म्हणूनच तर यावर्षी व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल मेहेंदी डिझाईन्स व्हायरल होत आहेत. बघा त्यातलं तुम्हाला नेमकं कोणतं डिझाईन आवडतं...

एरवी सणासुदीला, लग्नकार्यात काढतो तशा भरगच्च डिझाईन्स मुळीच काढू नका.. असं काहीसं छानसं पण खूप बोलकं काढून तुमच्या प्रेमाची कबूली द्या...

असं त्याच्या नावाचं इनिशियल काढूनही तुम्ही प्रेमाची कबूली देऊ शकता.

अशा पद्धतीची डिझाईन दोन्ही हातांवर काढा आणि त्याला ती दाखवून त्याच्या प्रपोजलला हो म्हणा... हो म्हणण्याची तुमची ही स्टाईल त्याला नक्कीच आवडून जाईल.

हे बघा हे आणखी एक व्हॅलेंटाईन्स स्पेशल मेहेंदी डिझाईन... युनिक आणि अतिशय स्टायलिश.