वसुबारस : दिवाळीचा पहिला दिवा उजळताना काढा स्पेशल वसूबारस सोपी रांगोळी; इतकी सुंदर की पाहात राहावे.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2024 04:41 PM 2024-10-28T16:41:52+5:30 2024-10-28T17:00:04+5:30
Vasubaras Diwali : very easy and beautiful vasubaras rangoli : वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस; दारासमोर हवीच स्पेशल रांगोळी दिवाळी म्हणजे फराळ (Faral), रोषणाई आणि बरंच काही (Diwali). मुख्य म्हणजे रांगोळीशिवाय हा सण अपूर्ण आहे. दिवाळीला हमखास दाराबाहेर रांगोळी काढली जाते. रांगोळीमुळे प्रसन्न वाटतं(Vasubaras Diwali : very easy and beautiful vasubaras rangoli).
आज वसुबारस. यंदा २८ तारखेला वसुबारस आली आहे. हिंदू धर्मात गोवत्स द्वादशीला विशेष महत्त्व असून गाईला पवित्र मानलं जातं.
दिवाळी हा सण वसुबारस या सणाने सुरु होते. या सणानिमित्त आपण दाराबाहेर किंवा अंगणात रांगोळी काढतोच.
वसुबारसनिमित्त आपणही दाराबाहेर सुंदर रांगोळी काढू शकता. ठिपक्यांची किंवा छापा काढण्यापेक्षा आपण याही पद्धतीने सुंदर रांगोळी काढू शकता.
गायीचे चित्र काढून, आपण त्याभोवतीने रांगोळी भरू शकता.
रांगोळीचे विविध रंग वापरून, आपण दार किंवा अंगणासमोर सुंदर अशी गाय वासराची रांगोळी काढू शकता.
जर आपल्याला गायीची रांगोळी काढायला जमत नसेल तर, आपण फक्त वसुबारस लिहून रांगोळी काढू शकता.
जर आपल्याला आकाराने मोठी रांगोळी काढायची असेल तर, गाय - वासरूची जोडी काढून, त्या भोवती फुलांची रांगोळी काढा.
आपण छाप्याचा वापर करूनही डिझाईन काढू शकता, आणि रांगोळीच्या मधोमध वसुबारस लिहू शकता.
रांगोळीचा रंग आणि तुमचा उत्साह हा घरातील प्रत्येकाचा चेहऱ्यावर आनंद घेऊन येईल हे नक्की. वसुबारसचीही सुंदर रांगोळी काढून, दिवाळी सण साजरा करा.