वटसावित्री पौर्णिमा: खूप वेळ न घालवता झटपट सुंदर मेकअप करण्याच्या ५ टिप्स, सगळ्यांपेक्षा देखण्या दिसाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2024 12:46 PM2024-06-18T12:46:07+5:302024-06-18T12:51:10+5:30

वटसावित्री पौर्णिमेच्या पुजेसाठी झटपट मेकअप करून तयार व्हायचं असेल तर या काही टिप्स नक्की लक्षात ठेवा. यामुळे तुमचा मेकअप अगदी पटकन तर होईलच, पण तो अतिशय सुंदरही होईल.

मेकअप करण्यापुर्वी सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याला टोनर आणि माॅईश्चराईज करून घ्या.

यानंतर कलर करेक्टर लावा. ते नसेल तर थेट कन्सिलर लावलं तरी चालेल. डोळ्यांखालची काळी वर्तुळं तसेच ओठांच्या आजुबाजुला असणारा थोडा काळसर भागा याठिकाणी कन्सिलर आवर्जून लावा.

यानंतर फाउंडेशन लावून घ्या आणि त्यावर कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर लावून छान बेस तयार करून घ्या.

आता डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी सगळ्यात आधी आयशॅडो आणि काजळ लावा. त्यानंतर अलगदपणे मस्कारा लावा.

गरज वाटल्यास भुवयांवरून आयब्रो पेन्सिल फिरवून घ्या. छानशी टिकली लावा.

यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे लिपस्टिक लावा. लिपस्टिक लावण्यापुर्वी लीप लायनरचा वापर जरुर करा. सगळ्यात शेवटी चेहऱ्यावर मेकअप फिक्सर स्प्रे करा. यावर छानशी हेअरस्टाईल केली की झाला तुमचा वटसावित्री पौर्णिमा लूक तयार...