Vegetarian Food are High in Protein : मासांहारापेक्षा दुप्पट प्रोटीन देतील ५ व्हेज पदार्थ; रोज खा, कायम फिट, मेंटेन राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 02:02 PM2022-10-25T14:02:01+5:302022-10-25T15:31:48+5:30

Vegetarian Food are High in Protein : सोया हा मांस आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी चांगला पर्याय आहे. सोया हा प्रथिनांचा उच्च स्रोत आहे.

प्रोटिन (Protein) म्हटलं की मासाहांराचे पदार्थ डोळ्यांसमोर येतात. व्हेजिटेरियन लोकांमध्ये प्रोटिन्सची कमरता असते किंवा व्हेज पदार्थांमधून पुरेपूर प्रोटिन्स मिळत नाहीत. असा अनेकांचा समज असतो. वास्तविक व्हेज पदार्थांमधूनही तुम्ही भरपूर प्रोटिन्स मिळवू शकता. फक्त हे पदार्थ रोज आणि योग्य प्रमाणात खायला हवेत. (Veg Protein Sources)

मेयो क्लिनिकनुसार, एखाद्या व्यक्तीला एका दिवसात किती प्रोटीनची गरज असते हे त्याच्या वजनावर आधारित असते. प्रथिनांचे प्रमाण 0.8 प्रति किलोग्रॅम वजन असावे. अशा परिस्थितीत जर तुमचे वजन 75 किलो असेल तर तुम्हाला एका दिवसात 60 ग्रॅम प्रोटीनची गरज आहे.

हाडे, स्नायू आणि त्वचेच्या निर्मिती आणि विकासामध्ये प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्या पर्यायांबद्दल सांगत आहोत, ज्याचे सेवन केल्याने तुम्हाला मांसाप्रमाणेच प्रोटीन आणि फायदे मिळतात.

हाडे, स्नायू आणि त्वचेच्या निर्मिती आणि विकासामध्ये प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्या पर्यायांबद्दल सांगत आहोत, ज्याचे सेवन केल्याने तुम्हाला मांसाप्रमाणेच प्रोटीन आणि फायदे मिळतात.

Webmd नुसार, फणस हा प्रोटिन्सला चांगला पर्याय आहे. याटमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असतात. 2.6 ग्रॅम जॅकफ्रूटमध्ये फळापेक्षा जास्त प्रथिने असतात.

मांसाहार न करता मांसामधून मिळणारी प्रथिने आणि इतर पोषक तत्वे मिळवायची असतील तर मशरूम हा एक उत्तम पर्याय आहे. मशरूमच्या 1 कप सर्व्हिंगमध्ये 3 ग्रॅम प्रथिने असतात. याव्यतिरिक्त, मशरूममध्ये कॅलरीज कमी असतात, भरपूर फायबर आणि अँटी-ऑक्सिडेंट असतात.

सोया हा मांस आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी चांगला पर्याय आहे. सोया हा प्रथिनांचा उच्च स्रोत आहे. यासोबतच यामध्ये सर्व आवश्यक अमीनो अॅसिड असतात, जे आपले शरीर स्वतः बनवू शकत नाही आणि म्हणून आहारातून मिळवणे आवश्यक आहे.

जे मांस खात नाहीत, त्यांनी कडधान्यांचे सेवन अधिक करावे. मसूर हे वनस्पती-आधारित पदार्थ आहेत, ज्यात प्रथिने तसेच फायबर आणि पोटॅशियम भरपूर असतात.

काबुली चणे हे शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. यासोबतच चण्यामध्ये मॅग्नेशियम, फायबर, आयरनही चांगल्या प्रमाणात असते.