5 किलोचे गुटगुटीत बाळ, नॉर्मल प्रसूतीनंतर आईने सांगितले उत्तम तब्येतीचे सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 04:48 PM2021-08-13T16:48:43+5:302021-08-13T17:33:45+5:30

Social Viral : सहजा जास्त वजन असलेल्या बाळाच्या जन्मासाठी आईला ऑपरेशनचा आधार घ्यावा लागतो पण या महिलेच्या बाबतीत असं काहीही झालं नाही.

जन्माच्यावेळी बाळाचे वजन साधारणपणे ७.५ पाऊंड म्हणजेच साडेतीन किलो असते. सोशल मीडीयावर एका वजनदार बाळाचा फोटो सध्या व्हायरल होतोय. एका महिलेनं कोणत्याही अडचणींना सामोरं न जाता ५ किलोच्या बाळाला जन्म दिला आहे. म्हणजेच जन्माच्यावेळी या बाळाचे वजन ११ पाऊंड होते.

या बाळाच्या आईनं सांगितलं की, ''मी कोणत्याही एपिड्यूरल किंवा पेन किलर औषधांची मदत घेतली नाही. कोणत्याही मेडिसिन्सचा आधार न घेता मी जास्त वजनाच्या बाळाला जन्म दिला आहे.'' सहजा जास्त वजन असलेल्या बाळाच्या जन्मासाठी आईला ऑपरेशनचा आधार घ्यावा लागतो पण या महिलेच्या बाबतीत असं काहीही झालं नाही.

टिकटॉकवर क्राफ्ट मॉम नावानं चर्चेत असलेल्या एका महिलेनं एका कॉल आऊट दरम्यान याचे उत्तर दिले. या कार्यक्रमात साधारण वजनापेक्षा जास्त वजन असलेल्यांची घोषणा करण्यात आली.

महिलेनं सांगितले की, ''तुम्हाला एक मोठं, जास्त वाढ झालेलं मुल पाहायचं? इथं असंच एक बाळ आहे. पण त्याच्या जन्माच्यावेळी मी कोणत्याही एपिड्यूरल आणि पेनकिलर्सचा गोळ्या घेतलेल्या नाहीत.''

महिलेनं आपल्या लहान बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत सांगितले होते की मी या बाळाला ४१ आठवड्यात जन्म दिला आहे.

बाळाच्या आईनं हे सगळं सांगितल्यानंतर सोशल मीडिया युजरनं पोस्ट लिहिली की, 'मी तुमचं दुख: समजू शकते. तुम्ही एक स्ट्राँग वूमन आहात.'

जेव्हा महिलेच्या फॉलोअर्सपैकी एकजण म्हणाला की, ती जिंकली आहे. तेव्हा तिनं उत्तर दिलं की,'' माझे वडील जन्माच्यावेळी १४ पाऊंडचे होते. म्हणून माझं बाळही इतकं वजनदार आहे.''

सोशल मीडिया युजर्स या महिलेवर कौतुकाचा वर्षाव करत असून अनेकांनी आपल्यात खूप हिम्मत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.