रोज पायी चालता तरी पोट १ इंचही कमी होईना? ५ कॉमन चुका टाळा, कमी वेळात येईल स्लिम लूक By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 04:59 PM 2023-12-06T16:59:09+5:30 2023-12-06T17:10:30+5:30
Walking Mistakes to Avoid For Weight Loss : नेहमी हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करा. फळं, ज्यूस असे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल. फिट राहण्यासाठी मॉर्निंग वॉक (Morning Walk) खूप महत्वाचे असते. वॉक केल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येते. याशिवाय सकाळी वॉक केल्याने ताण-तणाव दूर राहतो. मॉर्निंग वॉक करताना काही बेसिक मिस्टेक्स केल्यामुळे वॉकचा पुरेपूर फायदा मिळत नाही आणि चालण्याचा काहीच उपयोग होत नाही. (Avoid 5 Mistakes While Morning Walk)
मॉर्निंग वॉकला जाताना नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवा. वॉक करून आल्यानंतर तेलकट पदार्थ खाऊ नका. जर तुमचे पाय दुखत असतील तर वॉक करणं टाळा.
१) सकाळी चालल्याने आळस आणि थकवा दूर होतो. याशिवाय शरीर फिट आणि एक्टिव्ह राहते.
२) मॉर्निंग वॉकनंतर जास्त खाऊ नका. कारण तुम्ही जास्त तेलकट किंवा कॅलरीजयुक्त पदार्थ खाल्लेत तर तुम्ही फिट एनर्जेटिक राहू शकणार नाही.
३) वॉक केल्यानंतर भरपूर पाणी प्या. जेणेकरून तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल आणि शरीर हायड्रेट राहील.
४) वॉकनंतर स्ट्रेचिंग करायला विसरू नका. स्ट्रेचिंगमुळे मांसपेशींचे आरोग्य चांगले राहील आणि वजनही कंट्रोलमध्ये राहील.
५) मॉर्निंग वॉकनंतर काय करायचं याचा प्लॅन रेडी ठेवा अन्यथा दिवसभर आळस येऊ शकतो.
नेहमी हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करा. फळं, ज्यूस असे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल