व्हायचं होतं पत्रकार पण सिनेमात झळकली, 21व्या वर्षी साखरपुडा मोडला आणि.. रश्मिका मंदानाची 'झुकेगी नहीं' गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2022 04:06 PM2022-04-05T16:06:34+5:302022-04-07T12:32:41+5:30

कतृत्त्वाच्या जोरावर नाव कमावणे वाटते तितके सोपे नाही, ग्लॅमरस जगात तर ती आणखी अवघड गोष्ट. केवळ सौंदर्य असून चालत नाही तर त्यासोबत प्रचंड कष्ट घ्यायची तयारीही लागते. रश्मिका मंदाना आपल्या कामातून ते सिद्ध करुन दाखवते...

रश्मिका मंदाना म्हणजे दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री, आपल्या उत्तम अभिनयाने आणि सौंदर्याने रश्मिकाने कमी कालावधीत खूप मोठे यश मिळवले आहे.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुष्पा चित्रपटातील श्रीवल्लीच्या भूमिकेने आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रश्मिकाचा आज वाढदिवस आहे.

अवघ्या २६ वर्षाची असणाऱ्या रश्मिकाने ४ वर्षात चित्रपटसृष्टीत नाव कमावले आहे. किरिक पार्टी या कन्नड चित्रपटाच्या माध्यमातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या रश्मिकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर एकाहून एक हिट चित्रपट केले आहेत. एका चित्रपटासाठी ती ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.

रश्मिकाच्या क्यूटनेसमुळे तिचे देशातच नाही तर जगभरात फॅन्स आहेत. त्यामुळेच नॅशनल क्रश अशी तिची ओळख बनली आहे. ती तिच्या सौंदर्यासोबतच फिटनेसबाबतही तितकीच आग्रही असते. त्यामुळे ती न चुकता वर्कआऊट करते.

‘पुष्पा’नंतर आता रश्मिका सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा सिनेमा १० जून रोजी प्रदर्शित होईल असे सांगण्यात येत आहे. याबरोबरच रश्मिका अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘अलविदा’ या चित्रपटातही झळकणार आहे.

‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटातील अल्लू अर्जून आणि रश्मिकाच्या भूमिकेची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. श्रीवल्लीची तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि तिच्या फॅन फॉलोईंगमध्ये त्यामुळे बरीच वाढ झाल्याचे दिसते.

रश्मिकाच्या चित्रपटातील भूमिका काहीशा गंभीर किंवा वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्रीच्या वाटत असल्या तरी प्रत्यक्षात ती खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ती नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते. रश्मिकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा