लग्नाच्या मुहूर्तवेळी काढण्यासाठी १० वेडिंग स्पेशल रांगोळ्या! टिपिकल डिझाइन्सऐवजी काढा हटके रांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 08:22 PM2022-06-01T20:22:51+5:302022-06-01T20:29:06+5:30

१. आजकाल लग्नसमारंभात डेकोरेशन हा पार्ट अतिशय महत्त्वाचा झाला आहे. जोपर्यंत वेडिंग थीमनुसार डेकोरेशन करत नाही, तोपर्यंत अनेक जणांना लग्नाचा फिल येत नाही..

२. म्हणूनच तर लग्नसमारंभ असेल तर इतर डेकोरेशननुसार तुमची रांगोळी सुद्धा अतिशय खास असावी आणि मुख्य म्हणजे वेडिंग थीमला मॅच होणारी असावी.

३. म्हणूनच तर मुहुर्ताच्या वेळी काढण्यासाठी या बघा काही खास वेडिंग स्पेशल रांगोळी डिझाईन्स.

४. एरवी रंग, फुलं वापरून आपण नेहमीच रांगोळ्या काढतो. आता लग्न आहे म्हटल्यावर ब्लाऊज पीस, हातातले हिरवे काकण, हळद- कुंकू, ओटी भरण्यासाठी वापरण्यात येणारे गहू, तांदूळ, खोबरं, हळकुंड हे सगळे साहित्य वापरून अनेक आकर्षक रांगाेळ्या काढता येतात.

५. लग्नघरात जर प्रवेशद्वाराजवळच अशी सुरेख रांगोळी काढली तर अगदी अंगणापासूनच लग्नघर सुरेख सजलेले दिसते.

६. इतर गोष्टींप्रमाणेच विड्याच्या पानांचा रांगोळीमध्ये अशा पद्धतीने करण्यात आलेला वापर अतिशय आकर्षक दिसतो.

७. रांगोळी काढायला एवढी मोठी जागा नसेल, तर यातला काही भाग कापून आपण अगदी छोट्या जागेतही अशा पद्धतीची लहानशी पण आकर्षक रांगोळी काढू शकतो.

८. मेहंदी हा प्रत्येक लग्नातला एक अतिशय जिव्हाळ्यचा कार्यक्रम.. म्हणूनच तर या रांगोळीतही फुलं, केळी याप्रमाणेच मेहंदी कोनाचाही अतिशय सुबक वापर करण्यात आला आहे.

९. या रांगोळ्या काढण्याचा आणखी एक फायदा म्हणजे आपल्याकडे असलेल्या ठराविक वस्तू व्यवस्थित मांडून ठेवल्या की झाली आपली रांगोळी तयार.. त्यामुळे अशी रांगोळी अतिशय झटपट काढता येते.

१०. एखाद्या लग्नघरी तुम्ही तुमची कल्पकता दाखवून अशी वेडींग थीमनुसार रांगोळी काढली तर तुम्ही तिथे भाव खाऊन जाणार हे नक्की...