३० दिवसांत वजन कमी करण्याचा डॉक्टर सांगतात खास हेल्दी उपाय, पोटही होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 08:38 AM2023-07-08T08:38:00+5:302024-07-08T18:19:15+5:30

Weight Loss Belly Fat :

वजन कमी करण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करत असतात. डाएट, वर्कआऊट, न्युट्रिशन ज्यामुळे लोक आपलं वजन सहज कमी करू शकतात.

एक्सपर्ट्स सांगतात की जे लोक व्यायाम करतात त्यांचे बॉडी मसल्स वाढतात आणि मसल्स वाढल्याने मेटाबॉलिझ्म वेगाने वाढतो.

मेटाबॉलिझ्म वाढल्याने वजन कमी होण्यास मदत होते. दरम्यान पोटाजवळचे फॅट खूपच जिद्दी असल्यामुळे ते लवकर कमी होतच नाही.

अलिकडेच तज्ज्ञांनी 36 तासांचे फास्टींग करून नाभीजवळची चरबी कमी करण्याचा उपाय सांगितला आहे.

आहारतज्ज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मिंडी यांनी 36 तासांचे फास्टींग आणि 12 तास खाणं हे रिपिट केल्यामुळे नाभीच्या जवळची चरबी कमी होत असल्याचे सांगितले आहे.

यात 36 तासांत जे काही होते ते तो वजन कमी करण्यासाठी आणि ब्लड शुगर लेव्हल मेंटेन करण्यासाठी योग्यवेळ आहे. ज्यामुळे शरीराची सूज कमी होते.

असं केल्याने शरीरातील फॅट्स एनर्जीमध्ये बदलतात आणि वजन वेगाने कमी होते. 36 तासांचे फास्टींग केल्यास वजन सहज कमी करण्यास मदत होते.