वजन कमी करण्यासाठी हिवाळा आहे एकदम परफेक्ट! रोज खा 'या' भाज्या आणि भराभर वजन उतरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2024 09:09 AM2024-11-29T09:09:35+5:302024-11-29T09:10:02+5:30

शरीर कमावण्यासाठी हिवाळा हा ऋतू एकदम परफेक्ट आहे. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर या दिवसांत तुम्ही ते पटकन करू शकता. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा..

वजन कमी करायचं असेल तर हिवाळ्यात तुमच्या आहारात ५ भाज्या थोड्या जास्त प्रमाणात असायला पाहिजेत, अशी माहिती आहारतज्ज्ञ दिव्या नाज यांनी न्यूज१८ ला दिली आहे. त्या भाज्या नेमक्या कोणत्या ते पाहा..

त्यापैकी सगळ्यात पहिली भाजी आहे फुलकोबी. त्यातून व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे ही भाजी तुमच्या आहारात नेहमीच असावी.

हिवाळ्यात मुळा, गाजर ही कंदमुळं भरपूर प्रमाणात मिळतात. फायबरचा ते एक उत्तम स्त्रोत आहेत. त्यामुळे ते आपल्या आहारात असतील तर आपोआप पोट भरल्यासारखं वाटतं आणि वारंवार भूक लागत नाही.

तिसरी भाजी आहे पत्ताकोबी. पत्ताकोबीमधून व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, लोह, कॅरेटिन योग्य प्रमाणात मिळतं. त्यामुळे योग्य पोषण मिळून वजन कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली अतिशय उत्तम मानली गेली आहे. त्यातून वेगवेगळी खनिजे, ॲण्टीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सॉल्यूबल फायबर भरपूर प्रमाणात मिळतात.

पालकामधून लोह आणि क्लोरोफिल भरपूर प्रमाणात मिळतं, जे अंगावरची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं.