रिकाम्या पोटी चालल्यास काय होतं? या व्यायामाचे वजन कमी करण्यासह ८ जबरदस्त फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 04:55 PM2024-12-09T16:55:39+5:302024-12-09T17:10:48+5:30

जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी चालता तेव्हा त्याचे परिणाम हे वेगळे असतात. रिकाम्या पोटी चालण्याचे जबरदस्त फायदे जाणून घेऊया...

रिकाम्या पोटी चालणं हा एक साधा आणि प्रभावी व्यायाम आहे जो तुमच्या शरीरासाठी तर फायदेशीर आहेच पण मानसिक आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. चालण्याचे अनेक फायदे आहेत.

आपण सर्व जाणतो की, चालण्याने आपले वजन नियंत्रणात राहतेच पण चालणे आपल्या रक्ताभिसरण आणि हृदयासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. मात्र, चालण्याची पद्धत फार कमी लोकांना माहिती आहे. योग्य मार्गाने चालल्याने अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात.

काही लोक सकाळी चालतात, तर काहींना संध्याकाळी फिरायला जायला आवडतं. जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी चालता तेव्हा त्याचे परिणाम हे वेगळे असतात. रिकाम्या पोटी चालण्याचे जबरदस्त फायदे जाणून घेऊया...

रिकाम्या पोटी चालण्याने शरीरातील फॅट बर्निंग प्रक्रिया वेगवान होते. जेव्हा तुम्ही जेवल्याशिवाय जाता तेव्हा शरीर उर्जेसाठी जास्त फॅटचा वापर करतं, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

सकाळी लवकर रिकाम्या पोटी चालण्याने मेटाबॉलिज्म वाढतं. यामुळे शरीराची कॅलरी बर्न करण्याची क्षमता वाढते, त्यामुळे दिवसभरात जास्त कॅलरीज बर्न होतात.

रिकाम्या पोटी चालण्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, ज्यामुळे शरीरात उर्जेचा संचार वाढतो. हे तुम्हाला दिवसभर सक्रिय आणि उत्साही ठेवतं.

व्यायाम केल्याने एंडोर्फिन बाहेर पडतात, ज्यामुळे मूड सुधारतो. रिकाम्या पोटी चालण्याने तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारतं.

रिकाम्या पोटी चालण्याने पचनसंस्थेलाही फायदा होतो. हे आतड्यांसंबंधी हालचाल वाढवते आणि पचन सुलभ करतं, ज्यामुळे गॅस आणि इतर पचन समस्या कमी होतात.

चालणं हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा व्यायाम आहे जो हृदयाचं आरोग्य सुधारतो. रिकाम्या पोटी चालण्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

रिकाम्या पोटी नियमित चालण्याने शारीरिक सहनशक्ती वाढते. याच्या मदतीने तुम्ही इतर व्यायामही सहज करू शकता.

व्यायामामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते, विशेषतः सकाळी. रिकाम्या पोटी चालण्याने शरीराला विश्रांती मिळते, ज्यामुळे झोप चांगली लागते.