Best Remedy For White Hair : फक्त १० रूपयांची चहा पावडर वापरून मिळवा काळेभोर केस; डोक्यावरचे पांढरे केस कायमचे होतील गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 01:53 PM2022-06-10T13:53:38+5:302022-06-10T18:56:45+5:30

What Is The Best Remedy For White Hair : पांढरे केस लपविण्यासाठी बरेच लोक केमिकल बेस्ड हेअर डाई वापरतात, परंतु यामुळे केसांमध्ये कोरडेपणा येऊ शकतो.

माणसाचे वय जसजसे वाढत जाते तसतसे त्याच्या शरीरात बदल होऊ लागतात, साधारणपणे 35 ते 40 वर्षांचे आयुष्य ओलांडल्यानंतर लोकांचे केस पांढरे होऊ लागतात, परंतु आजच्या युगात तरुणाईलाही या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागतो. (What Is The Best Remedy For White Hair)

पांढरे केस लपविण्यासाठी बरेच लोक केमिकल बेस्ड हेअर डाई वापरतात, परंतु यामुळे केसांमध्ये कोरडेपणा येऊ शकतो, त्यामुळे केस काळे होण्यासाठी फक्त नैसर्गिक पद्धती वापरणे चांगले आहे, (Can white hair turn black again home remedies) ज्यामुळे तुमची समस्या दूर होईल.

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की स्वयंपाकघरात वापरात असलेल्या चहाच्या पानांच्या मदतीने तुम्ही तुमचे केस पुन्हा काळे करू शकता. जुन्या काळापासून चालत आलेला हा असा घरगुती उपाय आहे. (Tea leaves for premature white hair home remedies solution how to use black colour dark)

चहाची पाने नैसर्गिक केसांच्या रंगासाठी उत्तम मानली जातात. ते वापरण्यासाठी, प्रथम एका भांड्यात पाणी गरम करा, आता त्यात सुमारे 5 चमचे किंवा 6 चहाच्या पिशव्या टाका, पूर्ण उकळी आणा आणि नंतर थंड होऊ द्या. ते टाळूवर लावा आणि सुमारे 45 मिनिटे तसंच राहू द्या. (Home Remedies To Get Rid Of Grey Hair Naturally)

शेवटी, कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा. केसांचा रंग थोडा गडद झाला आहे असे तुम्हाला वाटेल. चांगल्या परिणामांसाठी ही प्रक्रिया नियमितपणे फॉलो करा.

जर तुम्हाला या घरगुती उपायाचा प्रभाव जास्त हवा असेल तर चहाच्या पानात 2 ते 3 चमचे कॉफी पावडर टाका आणि गॅसवर सुमारे 15 मिनिटे उकळा.

थंड झाल्यावर ३० मिनिटांसाठी डोक्याला लावा. केसांचा रंग दाट झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. केसांना चहाच्या पानाचे पाणी लावल्यानंतर शॅम्पू वापरू नका. साध्या पाण्यानं केस धुवा.