यामी गौतमच्या सादगीवाल्या नितळ सौंदर्याचे सिक्रेट काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 06:34 PM2021-06-22T18:34:53+5:302021-06-22T18:44:38+5:30

यामी त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी ब्युटी प्रोडक्टसपेक्षा नैसर्गिक घटकांचा वापर करते. नारळाचं पाणी, तांदळाचं पीठ, दूध, दही, गावरान तूप, एरंडेल तेल हे तिच्या सौंदर्याचं नैसर्गिक गुपित आहे.

हिंदी चित्रपटांसोबतच तेलगू आणि तामिळ चित्रपटातही नाव कमावणार्‍या यामी गौतमचं लग्न झालं आणि तिच्या सौंदर्याची चर्चा नव्यानं होवू लागली.

फेअर अँण्ड लव्हली गर्ल म्हणून प्रेक्षकांवर छाप पाडणार्‍या यामीनं विकी डोन्र, बदलापूर, काबिल, बाला य चित्रपटातल्या भूमिकांमधून सौंदर्यासोबतच अभिनयाच्या बाबतीतही आपली ओळख निर्माण केली.

ताजा तवाना, चमकदार चेहेरा आणि त्यावरचं तिचं लांबलचक मोकळं हसू ही यामीच्या सौंदर्याची मुख्य खूण. आपल्या ब्यूटी सिक्रेटबद्दल यामी मोकळेपणानं बोलते.

यामी त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी ब्युटी प्रोडक्टसपेक्षा नैसर्गिक घटकांचा वापर करते. नारळाचं पाणी, तांदळाचं पीठ, दूध, दही, गावरान तूप, एरंडेल तेल हे तिच्या सौंदर्याचं नैसर्गिक गुपित आहे.

यामी फेशिअलसाठे टोनर म्हणून नारळाचं पाणी वापरते. ती म्हणते नारळाच्या पाण्यानं चेहेर्‍याला चमक येते आणि त्वचा ओलसर राहाते.

त्वचा चांगली होण्यासाठी यामी तांदळाचं पिठ दूधात किंवा दह्यात मिसळून तो लेप नियमित चेहेर्‍याला लावते.

त्वचा नैसर्गिकपणे स्वच्छ करण्यासाठी ती मध, गुलाब पाणी, ग्लिसरीन आणि लिंबाचा रस एकत्र करुन चेहेर्‍यास लावते.

आपल्या पापण्यांच्या सौदर्याचीही यामी विशेष काळजी घेते. त्यासाठी ती एरंडेल तेल, व्हिटॅमिन ई ऑइल आणि कोरफडीचा गर एकर करुन त्याचं मिश्रण लावते.

ओठाची लाली आणि नरमपणा जपण्यासाठी लिप बाम न वापरता यामी गावरान तूप ओठांना लावते.

केस चमकदार आणि रेशमी होण्यासाठी यामी अंड्यातला पांढरा भाग आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करुन ते मिर्शण हेअर मास्क म्हणून केसांना लावते.