What to eat after eating junk food and spicy food to avoid acidity and indigestion
जंकफूड- तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच खा 'हे' ५ पदार्थ, अपचन- ॲसिडीटी होणार नाही By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2024 04:36 PM2024-01-04T16:36:00+5:302024-01-04T16:55:12+5:30Join usJoin usNext कितीही टाळलं तरी जंकफूड खाण्याचा, तेलकट- मसालेदार पदार्थ खाण्याचा मोह होतोच. असे पदार्थ खाल्ले की मग बऱ्याच जणांना ॲसिडीटी- अपचनाचा त्रास होतो. असा त्रास होऊ नये म्हणून जंकफूड किंवा इतर तेलकट- तुपकट मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर नेमके कोणते पदार्थ खावेत, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी sakshilalwani_nutritionist या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. ते पदार्थ नेमके कोणते आणि ते कोणत्या पदार्थांनंतर खावेत, ते पाहा... डेझर्ट खाणं झालं असेल तर त्यानंतर भरपूर पाणी प्या. मसालेदार पदार्थांचं खाणं झालं असेल तर त्यानंतर पेर किंवा संत्री- मोसंबी खा. इंस्टंट नूडल्स खाल्त्यानंतर एक सफरचंद खा. तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर सेलेरी ज्यूस म्हणजेच अजमोदचा रस प्यावा. बार्बेक्यू फूड खाल्लं असेल तर त्यानंतर एक केळ आवर्जून खा. वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स, कुरकुरे असे क्रॅकर्स फूड खाल्ल्यानंतर ओट्स खा.. हे पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्ही खाल्लेल्या जंकफूडमधील किंवा तेलकट- तुपकट पदार्थांमधील अतिरिक्त शुगर शरीराबाहेर पडण्यास मदत होते. या फळांमधले ॲण्टीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स पचनासाठी चांगले असलेले गुड बॅक्टेरिया आतड्यांमध्ये तयार करतात. त्यामुळे अपचन, ॲसिडीटी असा त्रास होत नाही. टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआहार योजनाहेल्थ टिप्सपाणीWeight Loss TipsfoodHealthy Diet PlanHealth TipsWater