रेखा असो की माधुरी दीक्षित, त्यांच्या चेहेर्यावर एक सुरकुती नाही! हे कसं जमतं त्यांना, तेच हे सिक्रेट By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 02:19 PM 2021-09-15T14:19:24+5:30 2021-09-15T14:28:11+5:30
अभिनेत्री रेखापासून आलियापर्यंत त्वचेची काळजी घेण्यासाठी, आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी घरगुती उपायांवर भर देतात. या घरगुती उपायांद्वारेच चेहेर्यावरच्या सुरकुत्या, वाढत्या वयाचा चेहेर्यावर दिसणारा परिणाम या अवघड समस्या त्यांनी सहज सोडवल्या आहेत. या अभिनेत्री आपल्या चेहेर्यावर करत असलेले घरगुती उपाय इतके सोपे आहेत की आपणही ते सहज करु शकतो. आपण कसं दिसतो? ही काळजी सामान्य महिलांपासून प्रसिध्द अभिनेत्रींपर्यंत प्रत्येकीला असते. पण केवळ काळजी करुन उपयोग नाही. काळजी घेण्यासाठी तशी पावलं उचलायला हवीत. सामान्यपणे सर्वांचा असा समज असतो की अभिनेत्री आपल्या सौंदर्याची काळजी केवळ महागड्या कॉस्मेटिक्सद्वारे घेत असतील. पण वास्तव तर हे आहे की अभिनेत्री रेखापासून आलियापर्यंत त्वचेची काळजी घेण्यासाठी, आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी घरगुती उपायांवर भर देतात. या घरगुती उपायांद्वारेच चेहेर्यावरच्या सुरकुत्या, वाढत्या वयाचा चेहेर्यावर दिसणारा परिणाम या अवघड समस्या त्यांनी सहज सोडवल्या आहेत. या अभिनेत्री आपल्या चेहेर्यावर करत असलेले घरगुती उपाय इतके सोपे आहेत की आपणही ते सहज करु शकतो.सुंदर होण्यासाठी पैसे नाही तर योग्य प्रयत्न लागतात हेच ऐश्वर्या, दीपिका, आलिया, माधुरी आणि रेखा या अभिनेत्री आपल्या कृतीतून सांगतात.
ऐश्वर्या रायची चमकणरी त्वचा पाहाणार्याला मोहात पाडते. मिस वल्र्ड स्पर्धेवेळी तिची जशी त्वचा होती तशीच आजही आहे. वाढत्या वयाचा तिच्या त्वचेवर जराही परिणाम झाला नाही. याबाबत ती आपल्या घरगुती सौंदर्योपचारांना प्राधान्य देते. त्वचा फ्रेश राहाण्यासाठी ऐश्वर्या काकडीचा लेप लावते. तसेच चेहेर्याच्या त्वचेला नैसर्गिक मॉश्चरायजर मिळावं यासाठी ती दह्याचा उपयोग करते. त्वचा स्वच्छ ठेवण्यासठी गरमरीत दळलेल्या बेसनपिठाचा उपयोग करते.
चेहेर्यावर सुरकुत्या पडू नये यासाठी दीपिका पादुकोण बॉडी मसाजला महत्त्व देते. यामुळे शरीर आणि मनाला आराम मिळत असल्याचं दीपिका सांगते. शरीर जर तणावमुक्त असेल तर स्वत: शरीरच सुरकुत्या आणि वयाच्या खुणा याविरुध्द लढण्यास तयार होतं. दीपिका न चुकता खोबेर्याच्या तेलानं संपूर्ण शरीराचा मसाज करते.
माधुरी दीक्षित चेहेरा चमकदार दिसण्यासाठी आणि सुरकुत्या टाळण्यासाठी दिवसातून दोनदा चेहेरा व्यवस्थित धुण्याला प्राधान्य देते. चेहेरा धुतला की सीरम लावते. रात्री चेहेरा धुतल्यानंतर टोनर आणि क जीवनसत्त्वयुक्त सीरम लावण्यास महत्त्व देते. त्वचा चमकदार होण्यासाठी माधुरी झोपण्याआधी नाइट क्रीम लावायचं कधीही विसरत नाही. तसेच त्वचेचं पोषण होण्यासाठी दूध, बेसन, मध, लिंबू या नैसर्गिक घटकांचा लेपासारखा वापर करते.
शरीर आतून शुध्द असेल तर चेहेर्यावर निर्मळ सौंदर्य चमकेलच यावर आलिया भटचा विश्वास आहे. त्यामुळे आलिया दिवसभरात भरपूर पाणी पिते. पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. त्वचेला क, अ आणि ई जीवनसत्त्व मिळायलाच हवं हा तिचा आग्रह असतो. त्वचा निरोगी राहाण्यासाठी सौंदर्योपचारांबरोबरच नियमित व्यायाम करण्याला आणि पौष्टिक पदार्थ खाण्याला आलिया महत्त्व देते.
पासष्टी पार रेखाच्या चेहेर्यावर एकही सुरकुती नाही याचं रहस्य कोणत्याही आयत्या सौंदर्योत्पादनात नाही. आरोग्य, फिटनेस आणि सौंदर्य याबाबत रेखा काटेकोर नियम पाळण्यावर भर देते. चेहेर्याचं क्लीन्जिंग , टोनिंग आणि मॉश्चरायझिंग करायचा कधीही कंटाळा करत नाही. आपलं सौंदर्य जपण्यासाठी रेखा अँरोमाथेरेपी आणि स्पा नियमित घेते.
सुरकुत्यांना लांब ठेवायचं असेल तर ऑइल बेस्ड क्लीन्जर वापरायला हवं, जीवनसत्त्वांच्या गोळ्या घेणं, चेहेर्याला आइस पॅक लावणं, नियमित चेहेर्यासाठीचा योग करणं आणि सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे झोपण्यापूर्वी चेहेर्यावरचा मेकअप काढणं याला ऐश्वर्या, दीपिका, आलिया, माधुरी आणि रेखा या सगळ्याजणीच खूप महत्त्व देतात.