which curd is more healthy, Homemade or Store-Bought Dahi?
नेहमीच विकतचं दही खाता? आरोग्यासाठी ते कितपत चांगलं? दही विकत आणताना ३ गोष्टी तपासा By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2024 05:31 PM2024-11-29T17:31:31+5:302024-11-29T17:39:01+5:30Join usJoin usNext दही विकत आणून खाणाऱ्यांचं प्रमाण सध्या खूप वाढलं आहे. कारण दही खाण्याचा तो सगळ्यात सोपा उपाय आहे.(which curd is more healthy- Homemade or Store-Bought Dahi? ) घरी दही लावायचं म्हटलं की त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. शिवाय घरी लावलेलं दही विकत मिळणाऱ्या दह्यासारखं घट्ट, चवदार होत नाही. त्यामुळे अनेकांना विकतचं दहीच आवडतं. विकतचं दही खाणं चांगलं की घरी केलेलं दही खाणं चांगलं याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी amitagadre या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्या सांगत आहेत की जर तुम्ही घरी तयार केलेलं दही जर खात असाल तर ते एक उत्तम प्रोबायोटीक आहे. हे दही जास्त शिळं न होऊ देता २ दिवसांत संपवलं पाहिजे. घरी तयार केलेलं दही खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे या दह्यात कोणतेही केमिकल्स आणि प्रिझर्व्हेटीव्ह नसतात. जर तुम्ही विकतचं दही खात असाल तर मात्र त्याची एक्सपायरी डेट तपासून घ्या. तसेच विकतचं दही घेताना त्यामध्ये ५ ग्रॅमपेक्षा जास्त साखर नाही ना हे देखील तपासून घ्या. जास्त साखर असणारं विकतचं दही खाणं टाळा. टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीfoodCooking TipsRecipe