आजचा रंग पांढरा : करा पांढऱ्या रंगाचे ५ पदार्थ, पोषण आणि चव दोन्ही बेमिसल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2023 08:13 AM2023-10-16T08:13:06+5:302023-10-16T08:15:02+5:30

White Color Recipies for Navratri White Color : आहारात विविध रंगांसोबतच पांढऱ्या रंगाच्या पर्थांचाही समावेश जरुर करायला हवा...

आपण नवरात्रात ज्याप्रमाणे ९ दिवस विविध रंगाचे कपडे घालतो त्याचप्रमाणे त्या रंगाचे पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास आरोग्याला त्याचा निश्चितच फायदा होतो. आहाराचा थोडा बारकाईने विचार केला तर असे पदार्थ आपण अगदी सहज खाऊ शकतो. त्यातीलच काही पदार्थांचा थोडक्यात आढावा घेऊया (White Color Recipies for Navratri White Color)...

इडली डोसा हे साऊथ इंडीयन पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचे असतात. आंबवलेले असल्याने आणि डाळ-तांदूळाचा समावेश असल्याने हे पदार्थ पौष्टीकही असतात.

खीर ही लहान मुले, आजारी व्यक्ती, गर्भवती स्त्रिया यांच्यासाठी अतिशय फायदेशीर असणारी रेसिपी आहे. यामध्ये तांदळाची, साबुदाण्याची, रव्याची, शेवयांची, दलियाची अशा विविध खिरींचा समावेश करता येऊ शकतो.

मुळा किंवा काकडी यांसारख्या पांढऱ्या रंगाच्या सॅलेड प्रकारात मोडणाऱ्या भाज्यांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्याने त्यांचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. मुळ्याचा चटका किंवा कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर हे जेवणात असेल तर जेवणाची लज्जत तर वाढतेच पण आरोग्यासाठीही ते फायदेशीर असते.

कढी हा दही किंवा ताकापासून केला जाणारा अतिशय उत्तम असा पारंपरिक आणि आरोग्यदायी पदार्थ आहे. विविध प्रांतात कढी करण्याची रेसिपी वेगवेगळी असते मात्र यामध्ये असणारे कडीपत्ता, मेथ्या, ताक किंवा दही हे पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात.

पुलाव हा आपल्याकडे केला जाणारा अतिशय कॉमन पदार्थ आहे. विविध प्रकारच्या भाज्या, पनीर, मसाले घालून केला जाणारा पुलाव वन डीश मिल म्हणूनही आपण अनेकदा करतो.