ही पाहा भारताची पहिली AI ब्यूटी क्वीन; सुपर हॉट मॉडेलची सोशल मीडियात व्हायरल चर्चा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 09:58 AM2024-06-20T09:58:33+5:302024-06-20T15:39:41+5:30

Who is India's first AI beauty queen Zara Shtavari : एका वेबसाईटवर तिने हेल्थ आणि लेटेस्ट फॅशनचे ब्लॉग्ससुद्धा लिहिले आहेत.

जारा शतावरी फॅनव्यू द्वारे AI जनरेडेट मॉडल्सच्या जगातील पहिली सौंदर्य प्रतियोगिता अससून टॉप १० च्या फायनलिस्टमधली एक आहे. भारतात राहणारी ती एक डीजिटल क्रिएटर आणि डिप्रेशन वॉरीयर आहे. (Who is India's first AI beauty queen Zara Shatavari)

ती खाण्यापिण्याची शौकीन असून तिला फिरायला आणि फॅशनच्या दुनियेत राहायला खूप आवडते. डिजिटल दिवाच्या एका वेबसाईटवर तिने हेल्थ आणि लेटेस्ट फॅशनचे ब्लॉग्ससुद्धा लिहिले आहेत.

जारा शतावरी ऑगस्ट २०२३ मध्ये इन्फ्लुएंटर मार्केटींग टॅलेंट मॅनेजरच्या रूपात डिजीमोजो eServices LLP मध्ये सहभागी झाली होती. जारा शतावरी सोशल मीडिया इन्फ्लुएंससर नोएडा, उत्तर प्रदेशमध्ये राहते. इंस्टाग्रामवर तिचे ७ हजार ५०० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

स्ट्रेटेजिक प्लॅनिंग, कंटेंट डेव्हलपमेंट, डेटा एनालायसिस, ब्रॅण्ड अवेयरनेस, इन्फ्लुएंसर मार्केटींग, सोशल मीडिया मार्केटींग, कंटेट क्रिएशन, फॅशन स्टायलिंग आणि करियर डेव्हलपमेंट गायडंस यात ती निपूण आहे.

जारा ही राहूल चौधरीची रचना आहे. जी स्वत:ला डिजीटल मीडिया एक्सपर्ट असल्याचे सांगते. शतावरी मिसएआय टॉप १० मध्ये होती.

त्यानंतर चौधरीने लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटलं की मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की जगभरातील १५०० सहभागींना फायनलिस्टच्या यादीत निवडण्यात आले आहे.

मिस ए आय एक ब्युटी स्पर्धा आहे. ज्यात कृत्रिम मॉडेल्सची स्पर्धा असते. मिस एआयचा ताज जिंकण्यासाठी त्यांची सुंदरता, टेक्निकल कौशल्य आणि सामाजिक प्रभाव पाहिला जातो.

जाराचे सुपर हॉट, स्टनिंग फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहेत.

(Image Credit- Social Media)