समंथाशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्याच्या आयुष्यात एन्ट्री घेणारी शोभिता नक्की कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2024 05:14 PM2024-08-08T17:14:48+5:302024-08-08T17:21:13+5:30

Who is Sobhita Dhulipala? Naga Chaitanya gets engaged after 3 years of Samantha Ruth Prabhu divorce : १००० ऑडिशन्समधून बाद, सावळ्या रंगामुळे ट्रोल; तरीही शोभिता धुलिपालानं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं

समंथासोबत (Samantha) घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य पुन्हा एकदा चर्चेत आला (Naga Chaitanya), आणि चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे शोभिता धुलिपाला. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होताच शोभिता धुलिपाला नक्की कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे(Who is Sobhita Dhulipala? Naga Chaitanya gets engaged after 3 years of Samantha Ruth Prabhu divorce).

शोभिता धुलिपाला ही एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिचा जन्म ३१ मे १९९२ रोजी आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू कुटुंबात झाला. तिने इकोनॉमिक्स या विषयी डिग्री संपादित केली.

शोभिताने आपल्या करिअरमध्ये खूप चढ उतार पाहिले. अपार कष्ट घेऊन तिने सिनेसृष्टीत स्वबळावर नाव कमावलं, आणि स्वतःचं एक स्थान निर्माण केलं.

शोभिताने २०१० पासून मॉडेलिंग करत करिअरला सुरुवात केली. २०१३ रोजी ती मिस इंडिया स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचली होती. एका मुलाखतीत स्ट्रगलबद्दल सांगताना, तिने हजारहून अधिक ऑडिशन्स दिल्या असून, काही वेळा नकार सुद्धा पचवले आहे.

शोभिताचा चित्रपटसृष्टीशी कोणताही संबंध नाही. तरीही तिने आजतागायत अनेक चित्रपटात काम केलं. याबद्दल शोभिता म्हणाली, 'माझा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नव्हता. मी ऑडिशनच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात प्रवेश केला. त्याकाळी मी १००० ऑडिशन्स दिल्या. गडद त्वचेच्या टोनमुळे अनेकदा नकार पत्करला.'

शोभिता पुढे म्हणते, 'जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करता, तेव्हा खूप आव्हानांना सामोरे जावे लागते. सुरुवातीला जाहिरातीच्या ऑडिशन दरम्यान मला अनेक वेळा सांगण्यात आलं होतं की, तू 'गोरी' नाही आहेस. जाहिरातींमध्ये दिसण्यासारखी सुंदर पण नाही आहेस असं मला सरळ तोंडावर सांगितलं गेलं होतं.'

मात्र, रंगामुळे तिचं टॅलेण्ट लपलं गेलं नाही. तिने हार न मानता स्वतःचं स्थान निर्माण केलं. अनुराग कश्यपच्या 'रमन राघव २.o' या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

'मेड इन हेवन' मधून तिला लोकप्रियता मिळाली. याशिवाय बिग बजेट 'पोनियिन सेल्वन: आय', 'पोनियिन सेल्वन: II' या चित्रपटामध्ये ती झळकली होती.

शोभिताला समंथाच्या स्ट्रगलचं कौतुक असल्याचं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. ‘बॉलिवूड बबल’ वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत रॅपिड फायर या खेळात, शोभिताला समांथाच्या कोणत्या गोष्टीचं कौतुक वाटतं असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तिने, 'तिचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. ज्या प्रकारे ती तिचं काम करते ते खूप भारी आहे.' असं ती म्हणाली.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, समंथा आणि नागा चैतन्य याचं घटस्फोट झाल्यानंतर काही वर्षाने शोभिता आणि नागा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. दोघंही परदेशात व्हेकेशनसाठी गेल्याच्याही चर्चा रंगल्या. पण दोघांनी याबाबत मौन पाळलं होतं. दरम्यान, आज हैद्राबादमध्ये साखरपुडा करत दोघांनी आपलं नातं जाहीर केलं.