जेवणानंतर विड्याचे पान का खातात? कारण जाणून घ्या , रोज एक विड्याचे पान खा- मिळतील कमालीचे फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2025 18:00 IST2025-04-10T17:53:18+5:302025-04-10T18:00:41+5:30

Why do people eat betel leaf after meals? do you Know the reason? : पाहा विड्याचे पान खाण्याचे फायदे. रोज एक पान खा आरोग्यासाठी ठरेल फायद्याचे.

जेवणानंतर पान खाण्याची पद्धत आपल्याकडे फार आधीपासून आहे. त्यामध्ये विविध मसाले तसेच फळांचे फ्लेवर घालून पान तयार केले जाते. पानाला आपल्याकडे व्यसनांमध्ये गणले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? हे विड्याचे पान औषधी असते.

मात्र नुसते विड्याचे पान खायचे. त्याला इतर पदार्थ लावले के त्याचा काही फायदा नाही. रोज एक विड्याचे पान खायलाही काहीच हरकत नाही. विड्याच्या पानाचे फायदे आणि महत्व जाणून घ्या.

भारतामध्ये विविध विधींमध्येही या विड्याच्या पानांना महत्व आहे. अनेक आजारांवर उपाय म्हणून हे पान वापरले जाते. आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठीही विड्याची पाने वापरली जातात.

शरीराला गरजेच्या आसणाऱ्या अनेक घटकांचा समावेश या विड्याच्या पानांमध्ये असतो. विड्याच्या पानांमध्ये शरीराला शक्ती प्रदान करणारे गुणधर्म असतात. तसेच हे पान प्रोटीन्सनी भरलेले असते. या पानात हेल्दी फॅट्सही असतात.

विड्याचे पान शरीरातील फायबर वाढवण्यासाठी उत्तम असते. तसेच त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. भरपूर प्रमाणात बीटा कॅरेटीन असते. जीवनसत्त्व 'सी' मिळवण्यासाठी विड्याचे पान नक्कीच खावे. यामध्ये अँण्टी ऑक्सिडंट्सही असतात.

तोंडाचे आरोग्य विड्याच्या पानामुळे छान राहते. दात, जीभ, हिरड्या इतर अवयव चांगले राहतात. तसेच कफ, सर्दी, खोकला असे आजार दूर ठेवण्यासाठी विड्याचे पान उपयुक्त असते.

पचनासाठी हे पान अगदी छान असते. म्हणूनच जेवणानंतर पान खाण्याची पद्धत आहे. जर पचायला जड जाणारे पदार्थ खाल्ले असतील तर, ते ही व्यवस्थित पचतात. विड्याचे पान खाल्ल्याने पोटाचे विकारही बरे होतात.

त्वचेसाठी विड्याचे पान औषधी असते. जर काही डाग असतील किंवा मुरूम असतील, तर ते बरे होतात. चेहर्‍याला या पानाची पेस्ट लावायची. पिंपल्स सतत येत असतील तर त्याचे प्रमाणही कमी होते.

वजन कमी करण्यासाठी या पानांची मदत होते. विड्याचे पान पोटातील घाण साफ करण्यासाठी मदत करते. तसेच फॅट्सचे प्रमाणही कमी करते. जर वेट लॉस करत असाल तर मग आहारात विड्याचे पान वापरायला सुरवात करा.