कडाक्याच्या थंडीमुळे त्रस्त? रोज ५ पैकी १ पालेभाजी खा; आजार राहतील लांब - तब्येत ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2024 05:22 PM2024-11-27T17:22:38+5:302024-11-27T17:36:14+5:30

Why Leafy Greens Are Your Magic Weapon : हिवाळ्यात कोणत्या ५ प्रकारच्या पालेभाज्या खाव्यात?

हिवाळ्यात जास्त प्रमाणात पालेभाज्या (Green Leafy Vegetables) मिळतात. पालेभाज्या खाल्ल्याने आरोग्याला बरेच फायदे मिळतात. मेथी, पालक, कांदा पात आणि शेपू खाल्ल्याने आरोग्याला मिळतात (Health Tips). पालेभाज्या खाताना अनेक जण नाक मुरडतात. पण हिवाळ्यात पालेभाज्या खायलाच हवे. पण हिवाळ्यात कोणते पालेभाज्या खाल्ल्याने आरोग्याला मिळतात?

हिवाळ्यात पालक खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए, सी, आणि के आढळते. आयुर्वेदिक डॉक्टर किशन लाल यांच्या मते, 'पालक शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते. यासह रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते(Why Leafy Greens Are Your Magic Weapon).

पालकाचे अनेक पदार्थ केले जातात. सूप, पराठा, किंवा भाजी देखील खाऊ शकता. पालकला सुपरफूड म्हणूनही ओळखले जाते.

हिरव्या मेथीची भाजी अत्यंत आरोग्यदायी मानली जाते. मेथीमध्ये फायबर, लोह आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. डॉक्टरांच्या मते, हे पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यास मदत करते.

आपण मेथीचे पराठे, मेथीची भाजी किंवा मेथी दाण्याचे लाडू करून खाऊ शकता. यामुळे गुडघेदुखी आणि इतर गंभीर आजारांचा धोका कमी होतो.

हिवाळ्यात चमचमीत चाकवतची भाजी खाल्ली जाते. त्यात फायबर, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. यामुळे पचन सुधारते आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते.

आपण चाकवतची भाजीव्यतिरिक्त पराठा, चपाती, रायता किंवा पातळ भाजी करू शकता.

कांद्याची पात ही भाजी चविष्ट आणि भन्नाट लागते. यामुळे आरोग्यालाही फायदे मिळतात. कांद्याच्या पातीत भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, ज्याच्या मदतीने रक्तदाब नॉर्मल राहण्यास मदत होते. यासह खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.

याव्यतिरिक्त यात आरोग्यदायी अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे हिवाळ्यात अवश्य कांद्याच्या पातेची भाजी खावी.

कोथिंबीर फक्त जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी नसून, हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासही मदत करते.

कोथिंबीरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यास मदत होते. आपण कोथिंबीरीची चटणी, सूप आणि सॅलडमध्येही घालू शकता.