लांब बाह्यांच्या ब्लाऊजचे नवीन डिजाइन्स; १० आकर्षक पॅटर्न, दंडही दिसतील बारीक-साडीचा दिसेल रुबाब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 02:10 PM2024-12-03T14:10:50+5:302024-12-03T14:28:31+5:30

Winter Blouse Sleeves Designs For Sarees : जर ब्लाऊज प्लेन असेल तर तर नेटचे स्लिव्हज लावून ब्लाऊज अधिक सुंदर बनवू शकता.

नेहमी नवीन ब्लाऊज डिजाईन्स निवडणं थोडं कठीण काम वाटतं. अनेकदा स्लिव्हजलेस घालून हवातसा लूक खुलून येत नाही. काही नवीन ब्लाऊज डिजाईन्स तुमचं काम सोपं करू शकतात. (How To Choose Long Sleeves Blouse)

सिंपल नेकलाईन डिजाईन्समध्ये तुम्ही प्लेन स्लिव्हजचं ब्लाऊज शिवू शकता. हे स्लिव्हज पॅटर्न शिवताना एल्बोपासून थोडं जास्त अंतर ठेवा. तुम्ही फूल स्लिव्हजसुद्धा शिवू शकता. (Winter Blouse Sleeves Designs For Sarees)

ब्रायडल किंवा हेवी साडीसाठी तुम्ही प्लेन किंवा पफ स्लिव्हज शिवू शकता. यामुळे तुम्हाला सुंदर लूक मिळेल. ब्लाऊजमध्ये थोडं जास्त वर्क असेल तरीही लूक खुलून येईल. (Saree Blouse Designs Long Sleeve Saree Blouse)

बिशप ब्लाऊज प्लेन ब्लाऊजमध्ये सुंदर दिसते. तुम्ही एल्बो डिजाईनजवळ प्लेन लेस जरी वर्क शिवू शकता. तुम्हाला गोटा पट्टी लूक आवडत असेल तर तुम्ही तसं ब्लाऊज शिवू शकता.

सिंपल सोबर लूकसाठी पफ स्लिव्हज हा उत्तम पर्याय आहे. या ब्लाऊजमध्ये तुम्ही सुंदर दिसण्याबरोबरच फॅशनेबलसुद्धा दिसता. तुम्ही ब्लाऊज नेकमध्ये टर्टल किंवा हाय नेकचे ब्लाऊज शिवू शकता.

जर ब्लाऊज प्लेन असेल तर तर नेटचे स्लिव्हज लावून ब्लाऊज अधिक सुंदर बनवू शकता.

जर तुम्हाला बांगड्या घालणं आवडत नसेल तर तुम्ही रफल स्लिव्हजचं ब्लाऊज शिवू शकता. यामुळे तुमच्या साडीला गॉर्जियस लूक मिळेल

फ्यूजन लूक जोडण्यासाठी तुम्ही मिनिमल ज्वेलरी घालू शकता.

जर तुम्हाला बांगड्या, कडे घालायला अजिबात आवडत नसेल तर तुम्ही रफल स्लिव्हजचे ब्लाऊज शिवू शकता. यामुळे साडीला सुंदर लूक मिळेल.