पाळीचा त्रास, सतत चिडचिड-कायम थकवा? महिलांनी न चुकता खायलाच हवीत ‘ही’ ८ फळं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2025 21:02 IST2025-01-28T20:52:02+5:302025-01-28T21:02:06+5:30
Women should definitely eat these 8 fruits : आठ फळे जी महिलांच्या स्वास्थ्यासाठी गरजेची आहेत.

निसर्गाने निर्माण केलेल्या पदार्थांची काहीही छेडछाड न करता ते तसेच खाणे फार पौष्टिक आहे. भाज्या, फळे यांमधून मिळणारे गुणधर्म इतर कशात नाहीत.
महिलांनी विविध फळे खावी. आपण शरीरातील कमतरतांसाठी औषधे घेतो. पण जर नियमित फळे खाल्ली तर या गोळ्यांची गरजच पडणार नाही.
महिलांसाठी उपयुक्त अशी आठ फळे आहेत. प्रत्येकीने ही फळे खावीच.
१.केळं
केळ्यात भरपूर मॅग्नेशियम व फायबर असते. पाळीत क्रॅम्प्स तसेच ब्लोटींग कमी करण्यासाठी केळं उपयोगी ठरतं. त्यामुळे पाळीतही केळं खाणं चांगलं.
२.कलिंगड
कलिंगडात शरीरासाठी गरजेचे असे पाण्याचे प्रमाण असते. कलिंगडात नैसर्गिक साखर असते. त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नीट राहते. पाळीत कलिंगड खावे.
३.पपई
पाळी वेळेवर येत नसेल तर पपई खा. पपई उष्ण असते त्यामुळे पाळी वेळेत येते. त्त्वचेसाठी पपई फार चांगली.
४.अंजीर
पचनसंस्थेचे कार्य सुरळीत ठेवण्यात अंजीर मदत करते. पोट साफ होते. गॅस होत नाही.
५.किवी
गर्भधारणेच्या काळात किवीचे फळ खावे. शरीरातील पेशी वाढवण्यासाठी किवीचे फळ उत्तम आहे.
६.कोहळा
कोहळ्याचे महिलांसाठी फार फायदे आहेत. आपल्या शरीराला हव्या असणाऱ्या जवळपास सर्वच गोष्टी त्यात आहेत. हे एक सर्वगुणसंपन्न फळ आहे.
७.डाळिंब
डाळिंब हृदयासाठी चांगले. यात अगदी कमी कॅलेरीज आणि जास्त फायबर असते. डाळिंब्याचा रस मुत्राशयासाठी फायदेशीर असतो.
८.सफरचंद
जीवनसत्त्व सी चा मस्त स्त्रोत म्हणजे सफरचंद. तसंतर शरीरासंबंधी सगळ्यासाठीच हे फळ चांगलं. वजनावर नियंत्रण ठेवण्यातही मदत करते.