वजन वाढणार नाही, हृदय- फुफ्फुस ठणठणीत राहील- फक्त १ काम करा, सायकल आहे का घरात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2024 11:31 AM2024-06-03T11:31:47+5:302024-06-03T17:15:53+5:30

वाढत्या वजनाचं, कोलेस्ट्रॉलचं टेन्शन असेल, आपल्याला भविष्यात मधुमेह, रक्तदाब असा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर अगदी आतापासूनच १ काम नियमितपणे करा.. तेवढं एक काम दररोज २५ ते ३० मिनिटांसाठी केलं तर अगदी वय वाढलं तरी तुम्ही मात्र तरुण आणि ठणठणीत राहाल.

ते काम म्हणजे सायकलिंग करणे. दररोज नियमितपणे सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत. ते नेमके कोणते याविषयी जनजागृती व्हावी म्हणून ३ जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून जगभर साजरा केला जाताे. सायकल चालविल्याने नेमके कोणते फायदे होतात याविषयी तज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल जटाळे आणि डॉ. विजय व्यवहारे यांनी दिलेली ही माहिती...

नियमितपणे सायकलिंग केलयाने हृदयाच्या आजारापासून लांब राहू शकतो.

फुफ्फुसाची क्षमता वाढते आणि रक्तवाहिन्यांचे आजार होत नाहीत.

नियमितपणे २५ ते ३० मिनिटे सायकलिंग केलयाने शरीरात हॅप्पी हार्मोन्स रिलीज होतात.

दररोज सायकल चालविल्याने मन दिवसभर प्रसन्न राहण्यास मदत होते. त्यामुळे स्ट्रेस लेव्हल खूप कमी होते.

सायकलिंग केल्याने उच्च रक्तदाब कमी होतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. पक्षाघातसारख्या आजारांचा धोकाही बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

पोट, मांड्या यावरील चरबी कमी होते. तसेच नियमितपणे सायकलिंग केल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

सांधे तंदुरुस्त राहतात. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास होत नाही. एकंदरीतच सायकलिंग केल्यामुळे शारिरीक क्षमता वाढण्यास मदत होते.