World Chocolate Day: रोज खा चॉकलेट, मूड बदलून टाकतील ५ फायदे - हो जाये कुछ मिठा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 02:21 PM2022-07-07T14:21:22+5:302022-07-07T14:30:54+5:30

१. आनंदाच्या गोष्टी घडल्या की पुर्वी पेढे- बर्फी खाऊन तोंड गोड करायचे, आता मात्र चॉकलेट, केक खाऊन दणक्यात सेलिब्रेशन केलं जातं.

२. शिवाय चॉकलेट खायला काही निमित्त लागतं असं थोडंच असतं.. चॉकलेट लव्हर्स तर कधीही चॉकलेटचा आस्वाद घेऊ शकतात. अशाच चॉकलेट प्रेमींसाठीच तर साजरा केला जातो World Chocolate Day.. ७ जुलै हा दिवस जगभर चॉकलेट डे म्हणून सेलिब्रेट करतात.

३. २००९ या वर्षीपासून हा दिवस साजरा केला जातो. १५५० साली युरोपमध्ये या दिवशीच चॉकलेटची निर्मिती झाली, असे मानले जाते. चॉकलेट खाणं हा केवळ एक आनंदाचाच भाग नाही, तर त्यातून आरोग्याला अनेक फायदेही होतात. त्यामुळे चॉकलेट खावं वाटलं ना तर बिंधास्त खा.

४. चॉकलेटच्या प्रकारातील डार्क चॉकलेट हे अधिक आरोग्यदायी मानले जाते. चॉकलेट खाताना जर योग्य ती काळजी घेतली आणि ते प्रमाणात खाल्ले तर दातही किडत नाहीत आणि कॅलरीज वाढून वजन वाढण्याची भीतीही राहत नाही.

५. अनेक जणींना मुडस्विंगचा खूप त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट चघळावे. कधी कधी खूप जास्त राग येतो, मुड ऑफ होतो. अशावेळी स्वत:च्या बोलण्यावरील ताबा सुटेल की काय अशी भीतीही वाटते. अशावेळी डार्क चॉकलेट खा. मनावर ताबा मिळविण्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल.

६. डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठीही डार्क चॉकलेट खाणे फायद्याचे मानले जाते. तसेच रक्तदाबाचा त्रासही नियंत्रित राहतो.

७. कॅलिफॉर्नियाच्या एका विद्यापीठात झालेल्या अभ्यासानुसार वजन कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट खाणे फायद्याचे ठरते.

८. रोज हॉट चॉकलेट घेतल्यास स्मरणशक्ती वाढते, असंही काही अभ्यासकांनी सांगितलं आहे.

९. कोको पावडरमध्ये असणारे फ्लेवोनाईड्स हे ॲण्टीऑक्सिडंट्स वाढत्या वयासंबंधी अनेक आजारांना दूर ठेवते.

१०. त्यामुळेच तर इच्छा झाली तर बिंधास्त चॉकलेट खा, पण त्याचा अतिरेक होणार नाही, याची मात्र काळजी घ्या.