World Obesity Day 2025 : एकेकाळी होते लठ्ठ हे ८ सेलिब्रिटी, आता झाले फिट! पाहा मेकओव्हर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 14:26 IST2025-03-04T14:18:00+5:302025-03-04T14:26:02+5:30
World Obesity Day 2025 : see inspiring fat to fit journey of celebrities : या ८ सेलिब्रिटींनी केले कमालीचे वेट लॉस. पाहा त्याची यादी.

वजन कमी करण्यासाठी अत्यंत कष्ट घ्यावे लागतात. पण ते कष्ट घेतलेच पाहिजेत. स्थुलता अनेक प्रकारच्या आजारांना आमंत्रण देते. वेळीच वजन कमी केले पाहिजे.
असे काही सेलिब्रिटी आहेत, जे आत्ता प्रचंड फिट आहेत, मात्र एकेकाळी भरपूर स्थूल होते. त्यांची फॅट टू फिट जर्नी अत्यंत प्रेरणादायी आहे.
भुमी पेडणेकर हिने ३३ किलो वजन कमी केले आहे. तिला तिच्या अति वजनामुळेच पहिला चित्रपट मिळाला. नंतर तिने वजन कमी केले (Weight Loss).
बॉलिवूडमधील गाजलेली फॅट टू फिट जर्नी ही सारा अली खानची आहे. तिने भरपूर वजन कमी केले. ती फारच जास्त स्थूल होती.
अर्जुन कपूरला आत्ता सिक्स पॅक्स असले तरी, एकेकाळी तो भरपूर जाड होता (Weight loss tips). १४ महिन्यात त्याने त्याचे वजन कमी केले.
भारती सिंग ही फार नावाजलेली विनोदी कलाकार आहे. तिच्या कारर्कीर्दीची सुरवात स्वत:च्या स्थूल शरीरावर विनोद करूनच झाली. मात्र आता तिने चांगलेच वजन कमी केले आहे.
दंगल चित्रपटासाठी अमीर खानने जवळपास २५ किलो वजन वाढवले होते. आणि नंतर तेवढेच वजन कमीही केले (Healthy Weight Loss). त्याला ५ महिन्यांचा कालावधी लागला होता.
एकेकाळचा अदनान सामी हा अत्यंत गाजलेला गायक आहे. त्याने १२० किलो कमी केले आहे. तो २३० किलोचा होता. डॉक्टरांनी वजन कमी करा नाही तर, जगणे कठीण आहे. असे सांगितल्यावर त्याने एवढे वजन कमी केले.
सोनाक्षी सिन्हा आजही चबी गर्ल म्हणूनच ओळखली जाते. पण पूर्वी ती भरपूर जाड होती. तिने जवळपास ३० किलो वजन कमी केले आहे.
नियमित डाएट करून आणि व्यायाम करून वजन कमी करता येतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे परिनिती चोप्रा. तिने जवळपास २८ किलो वजन कमी केले. ती मार्शल आर्ट व कलारीपयट्टू हे प्रकार शिकलेली आहे.