World Vegetarian Day: ८ सेलिब्रिटी, जे आज आहेत शुद्ध शाकाहारी! बघा का सोडलं त्यांनी कायमचं नॉनव्हेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2022 06:10 PM2022-10-01T18:10:37+5:302022-10-01T18:16:21+5:30

१ ऑक्टोबर हा दिवस जागतिक शाकाहार दिवस म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्ताने असे काही बॉलीवूड सेलिब्रिटी बघा ज्यांना आधी नॉनव्हेज खाणं खूप आवडायचं, पण काही कारणामुळे आता मात्र त्यांनी नॉनव्हेज पुर्णपणे सोडून दिलं असून ते आता शुद्ध शाकाहारी झाले आहेत. त्यातले काही जणं तर व्हेगन फूड घेणारे आहेत.

२. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिनेही काही वर्षांपासून मांसाहार सोडला असून आता ती वेगन आहे. ती म्हणते पर्यावरण, प्राणी आणि स्वत:चं आरोग्य वाचविण्यासाठी वेगन होणं हा उत्तम पर्याय आहे.

३.अभिनेत्री श्रद्धा कपूर ही देखील २०१९ पासून शाकाहारी झाली असून तिनेही वेगन डाएट किंवा प्लान्ट बेस डाएटवर भर दिला आहे. गायीच्या दुधाऐवजी बदामाचे दूध पिण्यास ती प्राधान्य देते.

४. अभिनेत्री रिचा चढ्ढा ही शाकाहारीच होती. मात्र काही वर्षांपासून तिने वेगन डाएटवर फोकस केला आहे. डेअरी पदार्थ तिने पुर्णपणे बंद केले असून भाज्या, फळे यावर तिचा जास्तीतजास्त भर आहे.

५. सोनम कपूर मांसाहारी होती. पण काही वर्षांपुर्वी ती शाकाहारी झाली अणि आता तर मागच्या ४ ते ५ वर्षांपासून तिनेही व्हेगन डाएटला सुरुवात केली आहे. २०१८ साली तिला PETA संस्थेचा ‘Person of the Year’ हा पुरस्कार मिळाला होता.

६. प्राणी हत्या किंवा प्राण्यांवरचे अत्याचार कमी व्हावेत, यासाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने व्हेगन डाएटवर भर दिला आहे. जेव्हापासून व्हेगन डाएट घेते आहे, तेव्हापासून मेटाबॉलिझम, पचन या क्रिया अधिक चांगल्या झाल्या असून वेटलॉससाठी त्याचा खूप फायदा होत असल्याचं ती सांगते.

७. अभिनेत्री अनुष्का शर्मा खूप वर्षांपासून व्हेगन डाएट घेते. तिच्याकडून प्रेरणा घेऊन स्टार क्रिकेटर तथा अनुष्काचा नवरा विराट कोहली यानेही मांसाहार सोडला असून तो ही आता व्हेगन झाला आहे.

८. अभिनेत्री कंगना ही देखील यापैकीच एक. तिने काही वर्षांपुर्वी मांसाहार सोडला. पण डेअर प्रोडक्ट्समुळे आपल्याला त्रास होतो आहे, हे लक्षात आल्यावर ती देखील व्हेगन डाएट घेऊ लागली. यामुळे तब्येतीच्या अनेक तक्रारी कमी झाल्या असं तिचं म्हणणं आहे.