Mirajet Abdul Karim Khan Memorial Music Festival play songs ranging from dawn to dawn
मिरजेत अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेत पहाटेपर्यंत रंगली गायन-वादन-जुगलबंदी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 06:11 PM2018-04-13T18:11:51+5:302018-04-13T18:11:51+5:30Join usJoin usNext दर्गा संगीत सभेचा प्रारंभ समीर अभ्यंकर (पुणे) यांच्या गायनाने झाला. अभ्यंकर यांनी राग देवगंधार आळविला. विलंबित एकतालात ‘रईन के आगे पिहरवा’ द्रुततालात ‘लाडली बनावत आया’ हा विलंबित ख्याल त्यांनी सादर केला. समीर अभ्यंकर यांना माधव मोडक यांनी तबला साथ, तर अजित पुरोहित यांनी हार्मोनियम साथ केली. संगीत सभेत रईस खान (धारवाड) यांनी राग नटभैरव गायिला. विलंबित एकतालात ‘रसिया मोरा’, द्रुत एकतालात ‘बेग बेग आयो मंदिर’ या चीजा त्यांनी गायिल्या. त्यांना सागर सुतार यांनी तबला साथ, मनोज जोशी यांनी हार्मोनियम साथ व संदीप गुळवणी यांनी तानपुरा साथ केली. टॅग्स :हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतसांगलीIndian Classical MusicSangli