मंत्री एकनाथ शिंदेंची भातशेती, गावकडचे फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 05:16 PM 2021-07-19T17:16:39+5:30 2021-07-19T17:34:51+5:30
दरे हे बामणोली येथून समोरच शिवसागर जलाशयाच्या पलीकडील काठावर वसलेले एक दुर्गम खेडेगाव आहे. मात्र, आपल्या गावावर प्रत्येकाचं प्रेम असतं, ते प्रेम मंत्री महोदयांनीही व्यक्त केलं. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे त्यांनी मिळवलेल्या पदवीमुळे नुकतेच चर्चेत होते. त्यानंतर, पुन्हा एकनाथ शिंदेचे शेतात राबतानाचे फोटो व्हायरल झाले होते.
मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार मुलगा श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे आपल्या मूळगावी जाऊन शेतात काम करताना पाहायला मिळाले होते.
आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे शेतात भाताची लागवड करताना दिसले आहेत. आपल्या मूळगावी जाऊन त्यांनी पुन्हा शेती करण्याचा आनंद घेतला. शिंदे कुटुंबाचं महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे मूळगाव.
यापूर्वीही एकनाथ शिंदे त्यांच्या दरे या गावात गेले होते. एक-दोन दिवस गावात घालवल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसोबत बुधवारी थेट शेत गाठलं.
त्यावेळी त्यांच्यासोबत मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि चुलत भाऊ महेश शिंदेही होते. शिंदे कुटुंबाने स्ट्रॉबेरीच्या शेतात जाऊन लागवड केली. महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावचे सुपुत्र आज राज्याचे मंत्री आहेत.
एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा आपल्या मुळ गावी दरे ता. महाबळेश्वर येथे येऊन आपल्या भात शेतात भात लावणी केली. तसेच बैलांचे औत हाकण्याचा आनंद घेतला.
दरे हे बामणोली येथून समोरच शिवसागर जलाशयाच्या पलीकडील काठावर वसलेले एक दुर्गम खेडेगाव आहे. मात्र, आपल्या गावावर प्रत्येकाचं प्रेम असतं, ते प्रेम मंत्री महोदयांनीही व्यक्त केलं.
शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. पण हल्ली गावाकडील लोक शेती व्यवसायाकडे पाठ करुन, नोकरीत जास्त लक्ष देत आहेत.
शेती हा एका दाण्याचे शंभर दाणे करणारा व्यवसाय आहे. त्यामुळे गावातील तरुण वर्गाला शेती करा असा संदेश एकनाथ शिंदेंनी यापूर्वीही शेतात काम करताना दिला होता.
एकनाथ शिंदेचे शेती करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.