How much times sex is best for men in a week to avoid erectile dysfunction
लैगिक जीवन : नियमित संबंध ठेवत नसालतर होते 'ही' गंभीर समस्या! By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 03:49 PM2019-10-15T15:49:49+5:302019-10-15T15:56:53+5:30Join usJoin usNext कुणालाही असं वाटत असतं की, त्यांच्या शरीराचे सर्वच बॉडी पार्ट्स चांगले रहावे. खासकरून प्रायव्हेट पार्टला अजिबातच काही होऊ नये असं सर्वांनाच वाटत असतं. पण तुम्हालाही भलेही वाटत असेल की, तुमचा पुरूषार्थ कायम ठेवण्यासाठी तुम्ही सगळं काही करत आहात, पण काही चुकांमुळेही तुमचा परफॉर्मन्स बिघडतो. कसा तो हे जाणून घेऊ... शारीरिक हालचाल - वेगवेगळ्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, जे पुरूष अॅक्टिव लाइफ जगतात आणि नियमितपणे एक्सरसाइज करतात त्यांचं लैंगिक जीवन फार आनंदी असतं. पण जे अॅक्टिव नसतात किंवा एक्सरसाइज करत नाहीत त्यांना इरेक्शन किंवा परफॉर्मन्सवेळी समस्या होऊ शकते. दातांची काळजी घेत नसाल तर - हे कनेक्शन तुम्हाला विचित्र वाटत असलं तरी रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, जर पुरूषांमध्ये इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या असेल तर त्यांना हिरड्यांशी संबंधित समस्या असण्याचीही शक्यता असते. इरेक्टाइल डिस्फंक्शनच्या रूग्णांमध्ये हिरड्यांची समस्या असण्याची शक्यता सात टक्क्यांनी अधिक असते. यामुळे तुमच्या तोंडातील बॅक्टेरिया तुमच्या शरीरात कधीही पोहोचू शकतात आणि प्रायव्हेट पार्टचे ब्लड वेसेल्सवरही याचा प्रभाव पडतो. तुम्ही नियमित शारीरिक संबंध ठेवत नसाल तर - कितीवेळा शारीरिक संबंध ठेवायचे हे वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे लागू पडतं. मात्र, अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिनच्या एका रिसर्चनुसार, आठवड्यातून फक्त एकदा शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पुरूषांना इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या होण्याचा धोका दुप्पट असतो. त्यामुळे आठवड्यातून किमान तीन वेळा शारीरिक संबंध ठेवणं योग्य मानलं जातं. तुम्ही कमी झोपत असाल तर... - जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत तेव्हा टेस्टोस्टेरॉन हार्मोनचं प्रमाण कमी होतं. याने थकवा जाणवतो आणि तुमच्या बोन डेन्सिटीवरही प्रभाव पडतो. या सर्वच गोष्टींचा तुमच्या प्रायव्हेट पार्टवरही प्रभाव दिसून येतो. कलिंगड खात नसाल तर.. - कलिंगडामध्ये सिटुलिन आर्जिनीन भरपूर प्रमाणात असतं. हे एक असं इनग्रेडिअंट असतं, जे सेक्शुअल फंक्शनला चांगलं इम्प्रूव्ह करतं. याने शरीरात नायट्रिक ऑक्साइडचं प्रमाणही वाढतं. ज्याने इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या ठीक केली जाते. त्यामुळे कलिंगडाचा आहारात नियमित समावेश करा. जास्त ट्रान्स फॅट्स खात असाल तर - जर तुम्ही जास्त ट्रान्स फॅट्स घेत असाल तर तुमची स्पर्म क्वॉलिटी घटते. त्यामुळे ट्रान्स फॅट्सचं सेवन कमी करा. जंक फूड्स, कुकीज, पिझ्झा, फ्रोजन फूड्सचं सेवन बंद करा. तुमचा स्क्रीन टाइम जास्त असेल तर... - एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जे पुरूष आठवड्यातून २० तासांपेक्षा जास्त नेटफ्लिक्सवर घालवतात, त्यांचा स्पर्म काउंट घटतो. या लोकांचा स्पर्म काउंट ४४ टक्क्यांनी घटतो असे रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे.टॅग्स :लैंगिक जीवनरिलेशनशिपहेल्थ टिप्सSex LifeRelationship TipsHealth Tips